Jalgaon Bank Election 
नाशिक

Jalgaon Bank Election | 'जेडीसीसी' बँकेवर मंत्री पाटील, महाजनांसह 12 उमेदवार बिनविरोध

Jalgaon Bank Election | उर्वरित नऊ जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात; 29 नोव्हेंबर रोजी मतदान

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (जेडीसीसी) बँकेच्या २१ संचालकपदांच्या निवडणुकीत मंगळवारी (दि.१७) माघारीच्या अंतिम दिवशी मोठ्या राजकीय घडमोडी पाहावयास मिळाल्या. माघारीच्या मुदतीपर्यंत शेवटच्या दिवशी तब्बल २०० उमेदवारांनी माघार घेतल्याने १२ जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. तर उर्वरित जागांसाठी ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

बिनविरोध जागांमध्ये महायुतीने निर्विवाद वर्चस्व गाजवले असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यासह १२ जणांची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये जागा वाटपावरून अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून, माजी मंत्री सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत.

माघारीच्या अखेरच्या दिवशी मंत्री गुलाबराव पाटलांविरुद्ध मैदानात असलेल्या भाजपच्या जयश्री महाजन, प्रभाकर सोनवणे यांच्यासह शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील यांनी अनपेक्षितपणे माघार घेतल्याने जळगाव सोसायटी गटातून निवडणूक लढवणारे शिवसेना (शिंदे गट) नेते व पालकमंत्री पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

जामनेरमधून मंत्री गिरीश महाजन, तर पाचोरा सोसायटी गटातून आ. किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील (अमोल शिंदे यांच्या माघारीनंतर) बिनविरोध निश्चित झाले. दरम्यान, मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून, छाननीअंती २४१ उमेदवारांचे ४०२ अर्ज पात्र ठरले होते, त्यापैकी २०० जणांनी माघार घेतल्याने आता ४१ उमेदवार मैदानात आहेत.

मुक्ताईनगरची लढत ठरणार लक्षवेधी

मुक्ताईनगर मतदारसंघात रक्षा खडसे विरुद्ध देवयानी देशमुख अशी थेट लढत होणार आहे. तर रावेरमध्ये राजेंद्र चौधरी, योगीराज पाटील, रमेश पाटील यांच्या लढतीकडे लक्ष राहणार आहे. येत्या २९ तारखेला जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये मतदान होईल, तर ३० तारखेला मतमोजणी पार पडणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT