Gold-Silver Rate Pudhari
नाशिक

Jalgaon Gold Silver Price | दिवाळी सरताच 'सुवर्णनगरी'त दरांची घसरण; सोने-चांदी स्वस्त

Jalgaon Gold Silver Price | जळगाव सराफ बाजारात दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. २४ कॅरेट सोने आणि चांदी ३ हजार रुपयांनी स्वस्त झाल्याने लग्नसराईच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

जळगाव (पुढारी वृत्तसेवा):

सणासुदीत चढ्या भावाने ग्राहकांच्या खिशाला फटका देणारे सोने आणि चांदीच्या दरांनी दिवाळीचा सण संपताच मोठी घसरण नोंदवली आहे. 'सुवर्णनगरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव सराफ बाजारात ८ नोव्हेंबर (लक्ष्मीपूजन) ते १२ नोव्हेंबर या अवघ्या पाच दिवसांत २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ३ हजार रुपयांनी, तर चांदीचे दर प्रतिकिलो ३ हजार रुपयांनी गडगडले आहेत.

ऐन लग्नसराईच्या तोंडावर दरात झालेली या घसरणीमुळे जळगावसह आणि संपूर्ण जिल्ह्यातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लक्ष्मीपूजन मुहूर्तावर २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४२ हजार रुपये, २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३० हजार ७० रुपये (प्रति १० ग्रॅम) होता, तर चांदीचा दर १ लाख ८८ हजार रुपये (प्रतिकिलो) इतका होता.

दिवाळीच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी मागणीमुळे २४ कॅरेट सोने ८०० रुपयांनी वाढवून १ लाख ४२ हजार ८०० रुपयांवर, तर २२ कॅरेट सोने १ लाख ३० हजार ८०० रुपयांवर पोहोचले. चांदीनेही उच्चांक गाठत १० नोव्हेंबर रोजी १ लाख ९० हजार रुपयांचा टप्पा पार केला.

मात्र, भाऊबीजेनंतर (११ नोव्हेंबर) बाजारातील चित्र अचानक पालटले. ११ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात १,३०० रुपयांची घसरण झाली, तर गुरुवारी (दि. १२) दरांनी मोठी कोलांटीउल्टी घेतली. एकाच दिवसात २४ कॅरेट सोने २,५०० रुपयांनी आणि चांदी तब्बल ५,००० रुपयांनी स्वस्थ झाले.

लग्नसराईसाठी संधी

दिवाळी संपताच आता तुळशी विवाह आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईचे वेध लागले आहेत. दरातील या घसरणीमुळे जळगावच्या सुवर्णपेठेत आता दागिन्यांच्या आगाऊ नोंदणीसाठी ग्राहकांची पावले पुन्हा वळण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT