Rape Case file photo
नाशिक

Jalgaon Crime | अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी चार जणांना अटक!

वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा क्रमांक २१६/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यात एक विधी संघर्षित बालक असल्याची माहिती आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीच्या अज्ञान व परिस्थितीचा फायदा घेत तिला खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. तेथे आरोपींनी वेगवेगळ्या वेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणात मनोहर रामा पाटील (वय ६५), मधुकर विश्वनाथ भारंबे (वय ६४), नारायण सोमा चौधरी (वय ५०) आणि विनायक वसंत पाटील (वय ५२) या चार प्रौढ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

एकत्रितपणे अत्याचार झाल्याचा प्रकार नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट या प्रकरणाबाबत महत्त्वाची बाब म्हणजे हा सामूहिक बलात्काराचा प्रकार नसून, गेल्या सुमारे वर्षभरात वेगवेगळ्या वेळी आरोपींनी स्वतंत्रपणे पीडितेवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

प्रकरणाचा पुढील तपास वरणगाव पोलीस करीत असून, तपासादरम्यान आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे. अल्पवयीन पीडितेची ओळख कायद्यानुसार गोपनीय ठेवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT