7 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त pudhari photo
नाशिक

Illegal Alcohol Transport : 17 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

निवडणूक काळात त्र्यंबकजवळील सापगाव फाट्यावर मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून नाशिक शहरात अवैधरीत्या मद्य येत असल्याने मद्याचा सुमारे 17 लाखांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव फाट्यावरच कारवाई करत जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे अवैध मद्य तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणाले आहेत.

गुजरातमधून नाशिककडे आणले जाणारे 66 बॉक्स विदेशी मद्य व बियरसह एकूण 17 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. अधीक्षक संतोष झगडे व उपअधीक्षक अ. सु. तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकास 6 जानेवारीला मद्यसाठा नाशिकच्या दिशेने जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे पथकाने जव्हार-नाशिक रोडवरील सापगाव फाटा (ता. त्र्यंबकेश्वर) येथे वाहन तपासणी सापळा रचला.

यावेळी ह्युंदाई कंपनीची काळ्या रंगाची क्रेटा कार (जीजे 5, आरक्यू 7018) तपासणी केली असता वाहनात दमण, दीव व दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्रीस असलेला विदेशी मद्य व बियरचा साठा आढळला. कारमधून 66 बॉक्स विदेशी मद्य व बियर जप्त करण्यात आली. या प्रकरणी हार्दिक प्रवीण दप्तरी (33, रा. अहमदाबाद) व भावेश अरुण रणपुरा (39, रा. भावनगर) या संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मद्यसाठा, वाहतूक करणारी कार, संशयितांकडील दोन मोबाइल असा एकूण 17 लाख 6 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक एन. एच. गोसावी, दुय्यम निरीक्षक आर. एन. सोनार, एस. आर. इंगळे, सहायक दुय्यम निरीक्षक हेमंत नेहेरे, एस. ए. माने, उर्वेश देशमुख, लक्ष्मीकांत अहिरे, स्वप्निल सूर्यवंशी व वाहनचालक महेश खामकर यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक एन. एच. गोसावी करत आहेत.

अवैध मद्यनिर्मिती, विक्री किंवा वाहतुकीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339995, व्हॉट्सॲप क्रमांक 8422009933 किंवा दूरध्वनी 0253-2581033 वर संपर्क साधावा.
संतोष झगडे, अधीक्षक, उत्पादन शुल्क

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT