Accident Pudhari
नाशिक

Shright Road Accident Death | रस्ताकामासाठी खोदलेल्या खड्यात पडून युवक मृत्युमुखी

Shright Road Accident Death | टाके हर्ष येथील श्रीघाट येथे रस्त्याचे काम सुरू असताना खोदलेल्या खड्ड्यात पडून २५ वर्षीय युवकत सोनू चंदर मेरांदे याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा

टाके हर्ष येथील श्रीघाट येथे रस्त्याचे काम सुरू असताना खोदलेल्या खड्ड्यात पडून २५ वर्षीय युवकत सोनू चंदर मेरांदे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे.

मात्र, रस्त्याचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराने वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. याबाबतची व्यथा आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे मांडली. आमदार खोसकर यांनी रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अभियंता व उपअभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार खोसकर म्हणाले.

याबाबत विधिमंडळात प्रश्न मांडून दोषी अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबनाची मागणी करणार आहे.
- हिरामण खोसकर, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT