ICAI Nashik CA Exam Results 2026 
नाशिक

ICAI Nashik CA Exam Results 2026 | सीए फायनलमध्ये नाशिकची दिया बोरा देशात आठवी

ICAI Nashik CA Exam Results 2026 | द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) मे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सीए फायनल परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) मे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सीए फायनल परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात नाशिकच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. शहरातील दिया हेमंत बोरा हिने ६०० पैकी ४५३ गुण मिळवत देशात आठवा आणि नाशिक शहरात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

तिच्या यशामुळे नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील गुणवंतांमध्ये सार्थक ज्ञानेश्वर तातार (४१५ गुण, द्वितीय), अथर्व अतुल चिखले (४०५ गुण, तृतीय), प्रणीत प्रशांत चोपडा (४०४ गुण, चतूर्थ) आणि स्नेहा योगेश लोढा (३९४ गुण, पाचवी) आली आहे.

देशातील सर्वात कठीण व्यावसायिक परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या सीए फायनलमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश विशेष मानले जात आहे. नाशिकमधून यंदा ६२९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ११४ विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

दोन्ही गटांसाठी बसलेल्या २४५ विद्यार्थ्यांपैकी ४२ विद्यार्थ्यांनी दोन्ही गट उत्तीर्ण केले आहेत. पहिल्या गटासाठी बसलेल्या २३३ विद्यार्थ्यांपैकी ११ जण उत्तीर्ण झाले. दुसऱ्या गटासाठी बसलेल्या १५१ विद्यार्थ्यांपैकी ३५ विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

देशपातळीवर पतियाळाच्या नूर सिंगला हिने ४९९ गुणांसह प्रथम, हावडाच्या रितीज सराफने ४७५ गुणांसह द्वितीय तर डोंबिवली पूर्व येथील सोहन अनिल मांजरेकरने ४७३ गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.

या निकालाबद्दल प्रतिक्रिया देताना आयसीएआय नाशिक शाखेचे अध्यक्ष सीए अभिजित मोदी यांनी सांगितले की, सीए ही देशातील अत्यंत आव्हानात्मक परीक्षा असून, नाशिकच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

विशेष म्हणजे मुलींचा सहभाग आणि यशाचे प्रमाण वाढत असल्याने सीए व्यवसायाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. निकालानंतर आयसीएआय नाशिक शाखेचे उपाध्यक्ष मनोज तांबे, सचिव विशाल वाणी, कोषाध्यक्ष दिलीप बोरसे, विकास समितीचे अध्यक्ष रोहन कुलकर्णी, शुभम मुंदडा, पीयूष चांडक तसेच माजी अध्यक्ष जितेंद्र फाफट यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT