द्राक्ष बागाईतदार शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आज होणार ऊहापोह File Photo
नाशिक

Grape Farmers Fraud | चांदवड तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना 31 लाखांचा गंडा; बिहार अन् उत्तर प्रदेशातील व्यापाऱ्यांवर गुन्हा!

Grape Farmers Fraud | द्राक्षमाल नेला पण पैसे दिलेच नाहीत! वणी-चांदवड परिसरातील 3 शेतकऱ्यांची मोठी फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

चांदवड : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील सोग्रस येथील शेतकऱ्यासह अन्य दोन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून द्राक्षमाल खरेदी करून त्याचे पैसे न देता ३१ लाख ३० हजार ४७३ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिहार व उत्तर प्रदेशातील दोन व्यापाऱ्यांविरुद्ध वडनेर भैरव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सोग्रस येथील शेतकरी संजय रमेश गांगुर्डे (५२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सज्जन रामप्रकाश शहा (रा. बेगुसराय, मेघोल, बिहार) व ओमप्रकाश यादव (रा. उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार संशयित व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून सोग्रस येथील संजय गांगुर्डे यांच्या गट क्रमांक ४०३ मधील पाच एकर क्षेत्रातील द्राक्षमाल खरेदी केला. या मालाचे एकूण २२२ क्विंटल २ किलो वजन असून, त्याची किंमत १९ लाख २० हजार ४७३ रुपये आहे. तसेच खडकओझर येथील शरद किसन पगार यांच्याकडून सहा लाख रुपये, तर वडनेर भैरव येथील गणेश सुभाष निखाडे यांच्याकडून सहा लाख १० हजार रुपये किमतीचा द्राक्षमाल संशयितांनी २६ मार्च २०२६ रोजी खरेदी केला.

मात्र, द्राक्षमाल ताब्यात घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांना मोबदल्यापोटी एक रुपयाही दिला नाही. शेतकऱ्यांनी वारंवार फोन करून पैशांची मागणी केली असता व्यापाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिन्ही शेतकऱ्यांनी वडनेर भैरवचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.

तिन्ही शेतकऱ्यांच्या द्राक्षमालाची एकूण ३१ लाख ३० हजार ४७३ रुपयांची रक्कम अद्याप न देता त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत फसवणूक केल्याप्रकरणी संशयित व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT