robbery cases pudhari photo
नाशिक

Robbery Case | समृद्धी महामार्गावर भरदिवसा दरोडा; शासकीय कार्यकारी अभियंत्याचे पिस्तूल दाखवून अपहरण व लूटमार

Robbery Case | आमने टोलनाक्याजवळ अभियंत्याला पिस्तूल लावून भररस्त्यात लुटले

पुढारी वृत्तसेवा

टिटवाळा : पुढारी वृत्तसेवा
समृद्धी महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या शासकीय कार्यकारी अभियंत्याच्या वाहनाचा पाठलाग करून शस्त्राचा धाक दाखवत त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील ३० हजार रुपयांची रोकड आणि मोबाइल फोन लुटून आरोपी पसार झाले. भरदिवसा घडलेल्या या घटनने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या प्रकरणाचा छडा लावत कल्याण तालुका पोलिस आणि ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छत्रपती संभाजीनगर येथून पाच संशयित आरोपींना अटक केली आहे.
महाराष्ट्र शासनाचे कार्यकारी अभियंता खान अब्दुल फरीद अब्दुल हमीद हे सोमवारी आपल्या इनोव्हा वाहनातून चालकासह छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते.

सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचे वाहन समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ६११ येथे आले असता (एम.एच. २०-एच.एन. ६३७७) क्रमांकाच्या एर्टिगा वाहनातून आलेल्या संशयित यांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. फळेगाव-विरुद्धपाडा परिसर गुरवली एक्सप्रेस-वेच्या शेवटच्या बिंदूजवळ संशयित यांनी वाहन अडवले.

त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून त्यांना वाहनातून खाली उतरवले आणि जबरदस्तीने स्वतःच्या एर्टिगा गाडीत बसवले. संशयितानी अभियंत्याचे अपहरण करत त्यांच्या जवळील ३० हजार रुपये आणि मोबाइल फोन हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांच्या चालकाला इगतपुरी येथील चॅनल क्र. ६१५ जवळ, घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर सोडून दिले.

लूटमार करून संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केले. या घटननेनंतर कल्याण तालुका पोलिसिंग गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुका पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने आणि ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने समांतर तपास सुरू केला.

घटनास्थळावरील तसेच संशयितांच्या संभाव्य मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचे विश्लेषण करण्यात आले. या तपासानंतर दरोडेखोरांचा माग काढत पोलिस पथक थेट छत्रपती संभाजीनगर येथे पोहोचले. तेथून आकाश मदनसिंग उसारे (२३), गोपाल कमलालाल बनमावत उर्फ राजपूत (२४), लहू जयसिंग बारवार (१८), दुर्गेश ताराचंद फटपुरे (२४) आणि आकाश बाबुलाल शेवाळे (२१) या पाच जणांना अटक केली.

महामार्गावरील गस्तीचा प्रश्न ऐरणीवर

समृद्धी महामार्गावर भरदिवसा शस्त्राचा धाक दाखवून शासकीय अभियंत्याचे अपहरण आणि लूटमार झाल्याने महामार्गावरील सुरक्षाव्यवस्थावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहनांचा पाठलाग करून प्रवाशांना लक्ष्य करण्याचा प्रकार गंभीर आहे. महामार्गातर्फे नियमित पोलिस गस्त, प्रभावी सीसीटीव्ही यंत्रणा आणि आपत्कालीन मदतव्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT