नाशिक : 'गोदा ते नर्मदा' या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभत्र्यंबकेश्वरला २५ एप्रिलला शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, विचार व वारसा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी २५ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत या जलयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
अहिल्यादेवींची जन्मभूमी चोंडी महाराष्ट्रात असून, त्यांचा प्रभावी सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राशी जोडलेला आहे. अहिल्यादेवींच्या कार्यातील सुशासन, महिला नेतृत्व, लोककल्याण, जलदृष्टी, वारसा संवर्धन यासाठी राष्ट्रीय मूल्ये महत्त्वपूर्ण आहेत.
विविध कार्यक्रम
अहिल्यादेवींचे जन्मगाव चोंडी आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून यात्रांचा २५ एप्रिलला शुभारंभ होईल. या यात्रांचा संगम शिडी येथे होणार असून, तेथून छत्रपती संभाजीनगर, घृष्णेश्वर, धुळे या मागनि इंदूर येथे २९ एप्रिलला समारोप होईल. या जलयात्रेदरम्यान विविध कार्यक्रम व उपक्रम जलयात्रेच्या मार्गावरील गावांमध्ये आणि शहरात होणार आहेत.