Nashik |रिपाइं देशभरात करणार विरोधकांचा निषेध

आठवले : काँग्रेसने नियोजनबद्ध महिला विधेयक बिल फेटाळले
Ramdas Athawale
Ramdas Athawale
Published on
Updated on

नाशिक : २०२३ मध्ये सर्व पक्षांनी एकमताने महिलांच्या ३३ टक्के आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिला होता. यावेळी भाजप आणि मित्र पक्षांनी संसदेत सादर केलेल्या महिला आरक्षणाच्या बिलाला विरोधकांनी विरोध केला. कॉंग्रेसने नियोजनबद्ध महिला विधेयक फेटाळले आहे, त्याचा निषेध नोंदविण्यासाठी रिपाइंच्या वतीने देशभरात निषेध आंदोलन केले जाईल, अशी भूमिका खा. रामदास आठवले यांनी मांडली.

Ramdas Athawale
Ashok Kharat Case |हॉटेल व्यावसायिक शैलेश कुटे यांची सहा तास चौकशी

बुधवारी (दि.२२) खासदार आठवले नाशिकमध्ये आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले, एनडीएस सरकारला २०२९ च्या निवडणुकीत महिलांना आरक्षण द्यायचे होते. नव्या विधेयकानुसार २७३ जागा वाढून संसदेतील जागा ८५० वर जाणार होत्या. मात्र, काँग्रेसने दक्षिण भारतातील राजकीय पक्षांना फितवून या विधेयकाला विरोध केला.

Ramdas Athawale
Nashik Missing Link road | मिसिंग लिंक जोडण्यासाठी हवे हजार कोटी

वास्तविक देशभरात सर्वच भागांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा वाढविण्याचा प्रस्ताव होता. मात्र, काँग्रेसने हे विधेयक नाकारले. २०१४ नंतर प्रथमच एखादे विधेयक नाकारले गेले आहे. वास्तविक, हे विधेयक संमत झाले असते, तर त्याचा सर्वाधिक फायदा एनडीएला होईल, अशी विरोधकांमध्ये भीती होती. कारण महिला विरोधकांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news