Heatwave Alert Pudhari
नाशिक

Goa Heatwave Yellow Alert| गोव्याची लाही-लाही! 22 एप्रिलपर्यंत उकाडा कायम राहणार; हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज

Goa Heatwave Yellow Alert| 21 रोजी यलो अलर्ट; 22 पर्यंत जाणवणार उकाडा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यात गेले काही दिवस उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दिवसा बाहेर पडणे मुश्कील झाले असून हा उकाडा २२ एप्रिलपर्यंत कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. दि. २१ रोजी उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सध्या उष्ण आणि बहुतांशी कोरडे हवामान कायम असून, गेल्या २४ तासांत पणजीमध्ये कमाल तापमान ३४.२ नोंदवले गेले, तर जास्त आर्द्रतेमुळे प्रत्यक्ष जाणवणारे तापमान ४२.२ पर्यंत वाढले. शुक्रवारी संध्याकाळी राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली.

अंदाजानुसार हवामान मुख्यतः कोरडे आणि सूर्यप्रकाशित राहील. १९ एप्रिलच्या आसपास काही भागात हलक्या सरींची शक्यता असून त्यानंतर उष्णता कायम राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT