डीचोली : पुढारी वृत्तसेवा
साखळी ग्रामीण भागात रानटी जनावरचा वावर वाढला असून बिबट्या गवा रेडा इत्यादी अनेक जंगली प्राणी वारंवार पाहायला मिळत आहेत. कुडणे पंचायत क्षेत्रातील शोभा मयेकर यांच्या घराच्या बाजूला रात्री बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. तर सुर्ला पंचायत क्षेत्रात गवा फिरताना निदर्शनास आला.
असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून प्राप्त झाली. पंचायत मंडळाने लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. उपलब्ध माहिती नुसार खनिज खाण बंदी काळापासून साखळी मतदारसंघातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वन्य जनावरे नागरिकांच्या निदर्शनास येत असल्याचे दिसून येते. डिचोली सत्तरी यां तालुक्याच्या सीमा भागात पाण्याच्या शोधात ही जनावरे येत असतील असा अंदाज स्थानिक शेतकरी व्यक्त करतात यंदा पाऊस नसल्याने अजूनही ही जनावरे यां भागात असल्याचे बोलले जाते.
स्थानिक प्रशासन आणि वनविभाग सतर्क
साखळी मतदार संघातील ग्रामीण भागात गवा आणि बिबट्याचा वावर असल्याची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी सतर्क होऊन उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्याभरापासून या भागात रानटी जनावर वारंवार दिसत असल्याचे स्थनिकांनी वनविभाग अधिकाऱ्यांना सांगितले आहे.