Girish Mahajan On Gokul Gite Victory: विधानपरिषद निवडणूक २०२६ कडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. त्यातल्या त्यात नाशिक विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या गोकुळ गिते यांनी बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला होता. आता निकालानंतर ते निवडून आले असून त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला.
हा विधान परिषदेतील नवडणुकीत झालेला मोठा उलटफेर असून अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच महायुतीचा मते फुटल्याचे दिसून आले. यानंतर शिंदे सेनेत्या नरेंद्र दराडे यांनी भाजपचे संकटमोचक गिरीष महाजन यांच्यावर गोकुळ गितेंना मदत केल्याचा आरोप केला. यावर गिरीष महाजन यांनी आपली बाजू मांडली असून महायुतीची मते कशी फुटली याची चौकशी होईल असे सुतोवाच देखील दिले.
गिरीष महाजन पत्रकारांशी बोलताना म्हणाले, 'नाशिक विधान परिषद निवडणूक निकाल हा धक्कादायक असून आम्ही चार पास दिवसापूर्व सबा घेतली होती. तिथे शेवटच्या दिवसापर्यंत होतो तरी देखील कौल आमच्या बाजूने लागला नाही. याबाबत मी शिंदे साहेबांना भेटणार आहे. कोणी विश्वासघात केला हे पाहणार आहे. आम्ही सर्वांनी प्रयत्न केला.'
नरेंद्र दराडे यांनी केलेल्या आरोपाबाबत बोलताना गिरीष महाजन म्हणाले की, 'पोटात एक ओठात एक असा माझा स्वभाव नाही. दराडेंनी असं बोलू नये ते आमदार राहिलेले आहेत. मात्र आणि माझ्या पक्षाची देखील ही संस्कृती नाहीये. महायुतीचे पावणे पाचशे मते असतांना फक्त २५० मते कशी मिळाली याचे आश्चर्य वाटते.
दरम्यान, गिते हे शिंदेंची भेट घेणार आहेत. ते शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांबाबत गिरीष महाजन यांनी याबाबत आपल्याला काही माहिती नाही असं सांगितलं.
गिरीष महाजन यांनी जळगावमध्ये राज्यात सर्वाधिक मते आम्हाला मिळाली. उबाठाला फक्त ५ मते मिळाली. राऊतांबद्दल बोलताना ते म्हणाले की जळगामध्ये तुम्हाला फक्त ५ मते मिळाली आहेत. तुम्ही तुमचं अपयश लपवण्यासाठी इतरांना यश कसं मिळालं कोणाचे काय झालं हे पाहता असं वक्तव्य महाजन यांनी केलं.