नाशिक : भारतात सध्याचे अवकाळी पाऊस, सतत येणारे महापूर, चक्रीवादळ, भूकंपांच्या घटनांमुळे मालमत्तेचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी जनरल इन्शुरन्स अतिशय गरजेचे झाले आहे. भारतात वैद्यकीय खर्चांसाठी स्वत:च्या खिशातून होणारा खर्च अजूनही भारताच्या एकूण आरोग्य खर्चाच्या 48 टक्के आहे. तसेच दक्षिण आशियात भारत हा सर्वाधिक आपत्तीप्रवण देश असून, जवळपास 80 टक्के लोकसंख्या पूर, चक्रीवादळे किंवा भूकंपांच्या धोक्याच्या सावटात असल्याचे यूएनडीआरआरच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे अशा जोखिमांपासून बचाव करण्यासाठी जनरल इन्शुरन्स ही अत्यावश्यक बाब ठरली आहे.
जनरल (सर्वसाधारण) इन्शुरन्सबद्दल अजूनही भारतात खूप गैरसमज आहेत. अनेकदा या विम्याकडे केवळ मोटर पॉलिसींसाठीची औपचारिक आवश्यकता किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आधार या नजरेतून पाहिले जाते. पण सामान्य विमा यापेक्षा कितीतरी मोठी भूमिका बजावतो. तो कुटुंबाची मालमत्ता जपतो, आर्थिक स्थैर्य राखतो आणि अनेक पिढ्यांपर्यंतच्या आकांक्षा सुरक्षित ठेवतो. त्यामुळे “कुटुंब-प्रथम” हा जोखीम संरक्षण दृष्टिकोन अत्यावश्यक आहे.
नॅशनल हेल्थ अकाउंट्सच्या अहवालानुसार वैद्यकीय खर्चासाठी स्वत:च्या खिशातून होणारा खर्च अजूनही भारताच्या एकूण आरोग्य खर्चाच्या 48 टक्के इतका आहे. संकटाच्या काळात भारतीय कुटुंबांना बचत वापरावी लागते किंवा कर्जाचा आधार घ्यावा लागतो. विमा क्षेत्रात, मोटर कव्हरेज अजूनही महत्त्वपूर्ण आहे, पण त्याचा हिस्सा आता एकूण नॉन-लाइफ प्रीमियमच्या सुमारे एक-तृतीयांशावर आला आहे, तर आरोग्य विमा वेगाने वाढत जाऊन आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सुमारे 37 टक्के इतका झाला आहे (आयआरडीएआय-रेडसीर-२०२४)
सर्वसाधारण विमा कसे संरक्षण देतो?
वाहन विमा : सध्या भारतात सुमारे 260 दशलक्ष दुचाकी आणि अंदाजे 50 दशलक्ष कार नोंदणीकृत आहेत (डेटा फॉर इंडिया-२०२५) आणि इतर वाहन प्रकारांसह एकत्रितपणे ही संख्या 30 कोटींपेक्षा अधिक आहे. अपघात, थर्ड पार्टी जबाबदारी आणि दुरुस्ती खर्चामुळे होणाऱ्या आर्थिक धक्क्यांपासून कुटुंबांचे संरक्षण करण्यासाठी मोटर विमा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.
आरोग्य विमा : रुग्णालय उपचाराचा सरासरी खर्च 2014 ते 2021 दरम्यान दुप्पट झाला आहे (एनएसएसओ). त्यामुळे फॅमिली फ्लोटर आणि टॉप-अप कव्हर अनिवार्य ठरले आहेत. तसेच, कुटुंबातील सदस्य परदेशात उच्च शिक्षणासाठी किंवा काम व पर्यटनासाठी प्रवास करतात. त्यामुळे ट्रॅव्हल इन्शुरन्सचे महत्त्वदेखील वाढले आहे.
घराचा विमा : जरी घर हे अनेकदा कुटुंबाचे सर्वात मोठे गुंतवणूक साधन असले तरीही भारतात फक्त सुमारे 1टक्क घरेच विमा संरक्षित आहेत. (आयआरडीएआय-२०२३)
इतर विमा : प्रादेशिक अर्थव्यवस्थेचा कणा असलेले लघु आणि मध्यम उद्योग (एसएमई) तसेच व्यवसाय विमा हे कौटुंबिक व्यवसायांना संरक्षण देतात.
कुटुंबाच्या संरक्षणाच्या गरजा पिढ्यानुसार बदलत चालल्या आहेत. तरुण कुटुंबे मोटर, गॅजेट आणि प्रवासासाठीच्या विम्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. मध्यमवयीन कुटुंबे घर, मालमत्ता आणि आरोग्य पॉलिसींद्वारे दीर्घकालीन स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक संरक्षण शोधतात. वृद्ध अवलंबिताना वैयक्तिक अपघात कव्हर आणि हेल्थ टॉप-अप्समधून आधार मिळतो. यामुळे त्यांना आपल्या उतरत्या वयात सन्मान आणि काळजीची खात्री मिळते. या बदलत्या गरजांचा विचार करून सर्वसाधारण विमा म्हणजेच जनरल इन्श्युरन्स कुटुंबांच्या जबाबदाऱ्या आणि आकांक्षांनुसार संरक्षण टिकवून ठेवतो.
काय आहेत फायदे
सामान्य विमा हे केवळ सुरक्षा जाळे नाही; संपत्तीचा रक्षक आहे.
पुरेसा विमा नसल्यास, कुटुंबांना अचानक खर्चांमुळे मालमत्ता विकावी लागते, कर्ज घ्यावे लागते किंवा भविष्यात काही बाबतीत तडजोड करावी लागते.
विम्यामुळे हे धोके संस्थांकडे हस्तांतरित होतात. त्यामुळे कुटुंब आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतात,
या विम्यामुळे आर्थिक सातत्य राखू शकतात आणि पुढील पिढ्यांना स्थैर्य पुरवू शकतात. त्यामुळे विमा हा खर्च नसून लवचिकता, स्वास्थ्य साधण्यात केलेली गुंतवणूक आहे.
सर्वसाधारण विम्याला सुरक्षिततेचे सक्षम साधन म्हणून स्वीकारताना प्रत्येक पिढीला केवळ मालमत्ताच नव्हे; तर आत्मविश्वास, आनंदी स्वास्थ्य आणि स्वप्न पाहण्याचे स्वातंत्र्य वारसा मिळतो. भारतीय कुटुंबे विम्यातून ही बाब सुनिश्चित करू शकतात.राकेश जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स