money  pudhari file photo
नाशिक

Nashik District Collector Fake WhatsApp Scam| जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे व्हॉट्सअॅपवर पैशांची मागणी

District Collector Fake WhatsApp Scam-

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप खाते तयार करून परिचित अधिकारी व इतरांकडे पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत अज्ञात सायबर भामट्याने ३० ते ५० हजार रुपयांची मागणी करणारे मेसेज पाठविले असून, एका तासात पैसे परत करण्याचे सांगून हे पैसे मागण्यात आले. हा प्रकार लक्षात येताच जिल्हा प्रशासनाने नाशिक शहर पोलिसांच्या सायबर सेलला पत्र देऊन चौकशीची मागणी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक व तहसीलदारांच्या आढावा बैठकीनिमित्त प्रशासनातील अधिकारी उपस्थित असताना बैठक सुरू असतानाच हा प्रकार उघडकीस आला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने काही तहसीलदार व अधिकाऱ्यांना पैशांची मागणी करणारे मेसेज प्राप्त झाले. परंतु, संशय आल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत थेट जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली.

त्यानंतर हा सायबर फसवणुकीचा प्रकार असल्याचे समोर आले. सायबर भामट्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाचा आणि छायाचित्राचा वापर करून त्यांच्या परिचितांना व्हॉट्सअॅपवर संदेश पाठविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT