Court File Photo
नाशिक

Nashik Anti Conversion Law | नाशिकमध्ये धर्मांतरणविरोधी कायद्यांतर्गत पहिला गुन्हा! 5 वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा अमन खान गजाआड

Nashik Anti Conversion Law | धर्मांतरणविरोधी कायद्यांतर्गत नाशिकमध्ये पहिला गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या धर्मांतरणविरोधी कायद्यांतर्गत नाशिक शहरात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीचे अल्पवयीन असल्यापासून लैंगिक शोषण करणे, अश्लील फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करणे, तसेच लग्नासाठी धर्मांतराचा दबाव टाकल्याच्या आरोपावरून अमन अफसर खान याच्याविरोधात गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तब्बल पाच वर्षे तिचा छळ केल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, २०२१ मध्ये पीडित तरुणी अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. त्यावेळी इन्स्टाग्रामवरून तिची आरोपीशी ओळख झाली. त्यानंतर आरोपी नियमितपणे तिची भेट घेऊ लागला. याच काळात पीडितेच्या वडिलांचे निधन झाले.

ती मानसिकदृष्ट्या खचलेली असताना आरोपीने तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत लग्नाचे आमिष दाखविल्याचा आरोप आहे. पीडिता १६ वर्षांची असतानाच आरोपीने तिला नाशिकमधील लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

'मी तुला सोडणार नाही, तुला पत्नी मानले आहे,' असे सांगून आरोपीने तिचा विश्वास संपादन करत अत्याचार केले. पीडिता १८ वर्षांची झाल्यानंतर त्याने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली.

मात्र लग्न करायचे असल्यास तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी धर्मांतर करावे लागेल, अशी अट आरोपीने घातल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडितेवर विशिष्ट पद्धतीने राहण्याचा दबाव टाकण्यात आला. बुरखा घालण्याची सक्ती तसेच परपुरुषांशी बोलण्यास मज्जाव करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT