Nashik to Mumbai Protest 
नाशिक

Nashik to Mumbai Protest | दिवाळीनंतर नाशिक-मुंबई मोर्चा काढणार

Nashik to Mumbai Protest | अपुऱ्या माहितीनंतर दातीर यांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

सिडको : पुढारी वृत्तसेवा
अंबड एमआयडीसीगतच्या परिसरातील भूजल प्रदूषण, रासायनिक सांडपाणी आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयातील बैठकीत अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने दिवाळीनंतर पिवळ्या पाण्याच्या कॅन हातात घेत शेतकरी नाशिक ते मुंबई मोर्चा काढणार असल्याचे इशारा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिला.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात अंबड येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या समवेत बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रणव पाखले व अधिकारी समवेत प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर, विष्णू जमदाडे, गोरख दातीर, रामदास दातीर, अरुण दातीर, शरद कडर्ले, बडोपंत दातीर, शांताराम दातीर, ज्ञानेश्वर आहेर, अविनाश टिळे आदीसह शेतकरी उपस्थित होते.

बैठकीत परिसरातील भूजलात मिसळलेल्या रासायनिक सांडपाण्याचा निचरा कसा केला जाणार, यासाठी कोणत्या कंपन्या जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर कोणती कारवाई होणार, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.

तसेच दूषित भूजल आणि रासायनिक सांडपाण्याचा संपूर्ण अहवाल तातडीने जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. सीईटीपी (कॉमन इफ्फ्लुअंट ट्रीटमेंट प्लांट) नेमका केव्हा सुरू होणार, त्याची कार्यपद्धती काय असेल, तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार, यावरही चर्चा झाली. एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, डीआयसी, नाशिक महापालिका आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त उपस्थितीत तातडीची उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.

प्रमुख मागण्या:

  • नापीक शेतीची तातडीने पाहणी करून स्वतंत्र अहवाल प्रसिद्ध करावा.

  • हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

  • प्लेटिंग उद्योगांच्या पर्यावरणीय ऑडिटमधील घोटाळ्यांची चौकशी करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT