Shalarth ID Pudhari
नाशिक

Fake Shalarth ID Scam | बनावट शालार्थ आयडी प्रकरणी धुळ्यात एक अटकेत

Fake Shalarth ID Scam | बनावट शालार्थ आयडीच्या आधारे शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आणखी एका संशयित आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक / धुळे : पुढारी वृत्तसेवा

बनावट शालार्थ आयडीच्या आधारे शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आणखी एका संशयित आरोपीला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

या प्रकरणातील संशयित प्रशांत तुळशीराम वाडीले (रा. धुळे) याला धुळे येथून ताब्यात घेण्यात आले. रविवारी (दि.१२) त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये हा गुन्हा दाखल आहे.

तपासात नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोणतेही वैध शालार्थ प्रस्ताव अथवा मान्यता नसतानाही, मागील तारखांचे नियुक्ती आदेश तयार करत बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे वेतन व थकबाकीची रक्कम काढल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात संबंधित मुख्याध्यापक, संस्थाचालक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षकांसह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या तपासात १२00 आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तपासादरम्यान, प्रशांत वाडीले याने काही संस्थांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आदेश तयार करत त्यावर तत्कालीन अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या मिळवून मोठ्या प्रमाणात वेतन व फरकाची रक्कम अदा होण्यास मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली.

गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे येथे कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT