विशेष तपास पथकाच्या (SIT) प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी आज (दि. ७) पत्रकार परिषद अशोक खरात प्रकरणाच्‍या तपासाची माहिती दिली.  Pudhari Photo.
नाशिक

Ashok Kharat case | भोंदू खरातविरोधात ठोस पुरावे; ४६५० लिंक्स हटविल्या : SIT प्रमुख सातपुतेंनी दिली तपासातील मोठी अपडेट

Ashok Kharat case | पीडितांची ओळख उघड न करण्‍याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

काय म्‍हणाल्‍या SIT प्रमुख तेजस्‍विनी सातपुते ?

  • अशोक खरातविरोधात एकूण १२ गुन्‍हे

  • आठ गुन्‍ह्यांचा तपास एसआयटीकडे

  • खरातने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा भासवत केले महिलांचे शोषण

  • खडे, चिंचोके इत्यादी गोष्टीद्वारे उकाळा पैसा

  • पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवणे महत्त्‍वाचे

  • ठोस पुरावे गोळा करुन तपास सुरु

  • ईडीला दिली सविस्‍तर माहिती

Ashok Kharat case

नाशिक : "भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत. त्‍याने पीडित महिलांचे धमकी देवून शोषण केल आहे. त्‍याच्‍यावर एकूण १२ गुन्‍हे दाखल आहेत. आम्‍ही सखोल तपास करत आहोत. या प्रकरणी पीडित महिलांनी धाडसाने फिर्याद दिली आहे. आता सर्वांचीच पीडितांच्‍या खासगी आयुष्‍य जपण्‍याची जबबादारी आहे. या प्रकरणी राज्‍य पोलीस ईडी सहकार्य करत आहे. एकुणच न्‍यायालयाच्‍या आदेशानुसारच या प्रकरणी अधिक खुलासा करता येणार नाही," असे विशेष तपास पथकाच्या (SIT) प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी आज (दि. ७) पत्रकार परिषद स्‍पष्‍ट केले.

अशोक खरातविरोधात एकूण 12 गुन्हे

तेजस्‍विनी सातपुते यांनी सांगितले की, "अशोक खरात याच्‍याविरोधात नाशिक आणि नगर मध्ये एकूण 12 गुन्हे दाखल आहे. एसआयटीकडे असलेल्या गुन्ह्यांपैकी ८ गुन्हे महिला लैंगिक, तीन गुन्हे फसवणूक, सावकरी आणि अंधश्रद्धेशी संबंधित आहेत. महिला लैंगिक अत्याचाराचे आठ गुन्हे आणि फसवणुकीचा एक गुन्हा असे ९ गुन्हे आहेत."

धमकी, भीती अन् लैंगिक शोषण...

या प्रकरणी एसआयटीने एकूण ३० साक्षीदार तपासले आहेत. खरात पीडित महिला आणि त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा भासवत होता. अंधश्रद्धा पसरविण्याचा काम करत होता. खडे, चिंचोके इत्यादी गोष्टीद्वारे तो पैसा उकळत होता. महिलांना कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवून, त्यांना बदनामीची धमकी देऊन लैंगिक शोषण करत होता. ईशान्यश्वर मंदिराच्या परिसरात अंधारात दैवी शक्ती असल्याचं भासवून अंधश्रद्धा पसरवत होता, असेही तपासात निष्‍पण झाल्‍याचे सातपुते यांनी स्‍पष्‍ट केले.

पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवणे महत्त्‍वाचे

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी पीडित महिला आणि कुटुंब धाडसाने पुढे आले आहे. लोक काय म्‍हणतील याकडे दुर्लक्ष करत पीडित महिलांनी फिर्याद दिली आहे. पीडित महिलांची ओळख पटू नये, गोपनीय ठेवणे महत्वाचे आहे. त्‍यांचे महिलांचे धैर्य टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे पोलिसांच्‍या पत्रकार परिषदेला बंधने आहेत, असेही सातपुते यांनी स्‍पष्‍ट केले.

तब्‍बल ४६५० लिंक हटविल्‍या, ४५१ अकाउंट बंद

अशा संवेदनशील प्रकरणांमध्‍ये न्यायालयाचे काही आदेश आहेत. तर्क वितर्क आधारे वार्तांकन टाळावे असे ही आदेश आहे. महिलांची ओळख पटविल्यास गुन्हा आहे. मद्रास न्यायालयाने दिलेल्‍या निकालानुसार, पीडित महिलांचे फोटो आणि लिंक्स सायबर टीमने डिलीट केल्या आहेत. आक्षेपार्ह पोस्‍ट प्रकरणी ४५१ अकाउंट थेट बंद केले आहेत. तसेच बदनामी कारक पोस्ट डिलीट केल्या आहेत, अशीही माहिती सातपुते यांनी यावेळी दिली.

ठोस पुरावे गोळा करुन तपास सुरु

या प्रकरणी 60 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करायचे आहेत. पहिल्या गुन्ह्यात आता 40 दिवस शिल्लक आहेत, इतर गुन्ह्यांची डेडलाईन जवळ आहे. ठोस पुरावे गोळा करून तपास सुरु आहे. फिर्यादी आणि साक्षीदार जे सांगतात त्यानुसार तपास केला जातो. गुन्ह्यांची पार्श्वभूमीवर बघता कुणी मदत केली असेल तर कारवाई केली जाईल. आमचा अजूनही तपास सुरू आहे. या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत गोपनीयता बाळगली जाणार आहे, असे स्‍पष्‍ट करत अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली असून बुधवारपर्यंत तो पोलीस कोठीडत आहे. पुढील गुन्ह्यांत आम्ही कोठडी मागणार आहेत. काही कारणास्तव आम्ही व्हीसीद्वारे आरोपीला हजर करत आहे. या प्रकरणात ईडीने माहिती मागितली ती दिली आहे यापुढेही सहकार्य राहील, असेही तेजस्‍विनी सातपुते यांनी स्‍पष्‍ट केले. या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही तेजस्विनी सातपुते यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT