Power Cut Pudhari
नाशिक

Nashik Rural Power Outage Anger|विस्कळीत विजेमुळे ग्रामीण भागात संताप

महावितरण अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांचे खडेबोल; १५ दिवसांत सुधारणेचा अल्टिमेटम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विकासकामांच्या प्रगतीपेक्षा लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आणि प्रशासनाविरोधातील नाराजी अधिक चर्चेत राहिली. ग्रामीण आणि दुर्गम भागांतील वीजपुरवठ्याचा बोजवारा, बागलाणमधील वाढती गुन्हेगारी, लोककलावंतांकडे खंडणी मागण्याचे प्रकार, मटका जुगाराचे खुलेआम सुरू असलेले प्रकार, निधी वितरणातील दिरंगाई आणि रखडलेल्या विकासकामांवरून लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विशेषतः महावितरणच्या कारभारावरून बैठकीत जोरदार खडाजंगी झाली. यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत ग्रामीण व दुर्गम भागांतील वीजपुरवठा येत्या १५ दिवसांत सुरळीत करण्याचे निर्देश दिले. कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

पालकमंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. २७) झालेल्या बैठकीत जिल्ह्याच्या विकासासाठी उपलब्ध निधी, त्याचा विनियोग आणि आगामी वर्षातील नियोजन यांसोबतच दुष्काळी परिस्थितीचाही विषय चर्चेला आला. आदिवासी आणि दुर्गम भागांतील वाड्या-वस्त्यांवर पुरेशा क्षमतेच्या वीजवाहिन्या नसणे, फीडर विभक्तीकरणाची कामे रखडणे, रोहित्रांची कमतरता आणि प्रस्ताव मंजुरीनंतरही प्रत्यक्ष कामे सुरू न होणे, अशा तक्रारी लोकप्रतिनिधींनी मांडल्या प्रत्येक तालुक्यात वीजपुरवठ्याची समस्या कायम असताना महावितरणकडून केवळ कामे सुरू असल्याची माहिती दिली जाते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत बदल होत नसल्याचा आरोप करण्यात आला. आमदार दिलीप बोरसे, डॉ. राहुल आहेर, हिरामण खोसकर यांनी सुरगाणा, कळवण, मालेगाव आणि पेठ तालुक्यांतील वीज समस्यांकडे लक्ष वेधले. आमदार दिलीप बनकर यांनीही वस्ती आणि मळे भागांतील वीजपुरवठ्याच्या समस्येसह गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा मांडला.

सर्वसाधारण योजनेवर

प्रत्येक तालुक्यात वीजपुरवठ्याची समस्या कायम असताना महावितरणकडून केवळ कामे सुरू असल्याची माहिती दिली जाते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत बदल होत नसल्याचा आरोप करण्यात आला. आमदार दिलीप बोरसे, डॉ. राहुल आहेर, हिरामण खोसकर यांनी सुरगाणा, कळवण, मालेगाव आणि पेठ तालुक्यांतील वीज समस्यांकडे लक्ष वेधले. आमदार दिलीप बनकर यांनीही वस्ती आणि मळे भागांतील वीजपुरवठ्याच्या समस्येसह गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा मांडला. आमदार सीमा हिरे यांनी निधी वितरण आणि प्रशासकीय दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आमदार राहुल ढिकले यांनी विकासकामांसाठी अपुरा निधी आणि सिंहस्थ कामांच्या संथगतीवर नाराजी व्यक्त केली. आमदार पंकज भुजबळ, गोकुळ गिते, किशोर दराडे यांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा प्रशासनासमोर वाचला. खासदार भास्कर भगरे, शोभा बच्छाव यांच्याकडून आमदारांप्रमाणेच निधी मिळण्याची मागणी केली.

४४८.७६ कोटींचा स्पिलओव्हर

२०२४-२५ मधील ३२९.४४ कोर्टीच्या दायित्यापैकी १७४.४२ कोटी अदा झाले. २०२५-२६ मधील २९३.७४ कोटींची भर पडल्याने यंदा एकूण दायित्व ४४८.७६ कोटींवर पोहोचले. मंजूर नियतव्ययाच्या ४६.५ टक्के निधी जुन्या कामांसाठी खर्च होणार आहे.

अनुसूचित जाती उपयोजनेतही निधी रखडला

दायित्वापैकी केवळ ३.८५ कोटी अदा झाले असून, २९.१६ कोटी प्रलंबित ३३.०१ कोटींच्या जुन्या आहेत. विशेष म्हणजे, नोव्हेंबरअखेर नवीन कामांसाठी एक रुपयाचाही निधी वितरित झालेला नाही.

आदिवासी उपयोजनेचे १५१.२७ कोटी प्रलंबित

कोटी अदा झाले असून, १५१.२७ कोटींची देणी बाकी आहेत. नवीन कामांसाठी ८८.०५ कोटी वितरित झाले आदिवासी उपयोजनेतील २१५ कोटींच्या जुन्या दायित्वापैकी ६३.७३ आहेत.

१,२०३ कोटींचा आराखडा मंजूर

नाशिक जिल्ह्याच्या विकासकामांसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होत असला, तरी मागील वर्षांतील अपूर्ण कामांचे दायित्व अर्थात 'स्पिलओव्हर' हा यंदाही नियोजनासमोरील मोठा अडथळा ठरत असल्याचे चित्र आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला १,५५१ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर झाला असला, तरी त्यातील मोठा हिस्सा जुन्या कामांची देणी भागवण्यात खर्च होणार आहे. ४४८.७६ कोटी रुपयांचे प्रलंबित दायित्व लक्षात घेता नव्या विकासकामांसाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १,२०३ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

प्रशासनाने दुष्काळाच्या मुकाबल्यासाठी आतापासूनच सज्ज राहावे : गिरीश महाजन

नाशिक: जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच सर्वंकष नियोजन करावे. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व पाणी तसेच नागरिकांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने तयारी करावी. दुष्काळाच्या काळात पाणी व चाराटंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून जबाबदारीने कामकाज करावे. रोजगार हमी योजनेतील कामांचेही आतापासून नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, महाराष्ट्र राज्य विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष तथा आमदार सुहास कांदे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, भास्कर भगरे, आमदार किशोर दराडे, पंकज भुजबळ, गोकुळ गिते, डॉ. राहुल आहेर, दिलीप बोरसे, नितीन पवार, दिलीप बनकर, अॅड. राहुल ढिकले, सीमा हिरे, सरोज आहिरे, हिरामण खोसकर, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा नियोजन समिती सचिव तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे (नाशिक), डॉ. कश्मिरा संख्ये (कळवण), जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासह कामांचा दर्जा राखावा आणि तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया गतिमान करावी, असेही त्यांनी सांगितले. वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करणे आणि गोदावरी नदीतील पाणवेली काढण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना गती देतानाच गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यावर भर देण्यात येत आहे. सांडपाणी वाहिन्या व प्रक्रिया केंद्रांची कामे आगामी चार ते पाच महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, कुंभमेळ्यापूर्वी रामकुंड परिसरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे महाजन यांनी सांगितले.

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पायाभूत सुविधा, इमारतींची दुरुस्ती व शैक्षणिक गरजांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच पुढील नऊ महिन्यांतील संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन सर्व विभागांनी पूर्वतयारी करावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विकासकामांचा आढावा सादर केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT