Ashok Kharat Case Pudhari
नाशिक

Ashok Kharat Case | भोंदू खरातचे साम्राज्य ईडी घेणार ताब्यात

Ashok Kharat Case -भोंदू खरातचे साम्राज्य ईडी घेणार ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

नाशिकः तंत्र-मंत्र, अघोरी पूजा आणि समस्यांचे निवारण करण्याचे आमिष दाखवत लोकांची फसवणूक करणारा भोंदू अशोक खरात आता गंभीर अडचणीत सापडला आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, धमक्या आणि आर्थिक फसवणूक प्रकरणांमुळे आधीच चर्चेत असलेल्या खरातच्या कोट्यवधी रुपयांच्या साम्राज्यावर आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठा घाव घातला आहे.

ईडीने खरातच्या विविध मालमत्तांची सखोल छाननी सुरू केली असून, संशयास्पद व्यवहारांच्या आधारे त्याच्या संपत्तीवर तात्पुरती टाच येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बोगस गुंतवणूक, मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणुकीच्या आरोपांमुळे त्याच्या अनेक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे आणि आर्थिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय, काही बँक खाती सील करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

खरातने तंत्र-मंत्राच्या नावाखाली भीती निर्माण करून महिलांचा YNC... पदा घेतल्याचेही तपासात उघड झाले आहे. राजकीय आणि प्रशासकीय संबंधांचा वापर करून त्याने मोठे आर्थिक जाळे उभे केले होते. मात्र, आता त्याच साम्राज्यालाच सुरुंग लागल्याचे चित्र दिसत आहे.

भोंदू खरातची संपत्ती-

पाथर्डीत १५० कोटींची ३० एकर जमीन,

सिन्नरच्या कहांडळवाडीत १ कोटीची ४५ एकर जमीन,

गौळाणेत ३० कोटींहून अधिक जमीन, मोक्याच्या जागी १५ भूखंड

मिरगावात १० कोटींहून अधिक किमतीचे फार्महाउस

अहिल्यानगर येथे ५ एकरचा कोट्यवधींचा भूखंड

ओझर विमानतळ परिसरात ५ कोटींची जमीन

जानोरी दहावा मैल भागात मोक्याच्या जागा

नाशिक कॅनडा कॉर्नरवर १ कोटीचे कार्यालय

कर्मयोगीनगरमध्ये ५ कोटींचा बंगला

निघोज येथे ४ एकर कोट्यवधींची जागा

शिर्डी भागात ७० कोटींहून अधिक जमीन, प्लॉट

गिरगावातील घरात कोट्यवधींची रोख रक्कम

गिरगावात मोक्याच्या ठिकाणी दुकाने आणि गोडाऊन,

मुंबई, पुणे येथेही शेकडो कोटींची स्थावर मालमत्ता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT