येवला (नाशिक) : तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-पीक पाहणी नोंदणी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचण येणार आहे. शेतकऱ्यांनी तत्काळ ई-पीक पाहणी नोंदवावी, असे आवाहन तहसीलदार आबा महाजन यांनी केले आहे.
माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीकपेरा
'माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीकपेरा' या संकल्पनेनुसार ई-पीक पाहणी ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी प्ले स्टोअरवर जाऊन ही ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करावे. त्यानंतर ई-पीक पाहणी ॲप वापरण्यासाठी लागणारी माहिती तेथे दिलेली असेल. या ॲपद्वारे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची माहिती स्वतः भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंद न केल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना, अनुदान वाटप, आपत्तीसंबंधी मिळणाऱ्या अर्थसहाय्याला मुकावे लागण्याची वेळ येऊ शकते. सरकारकडून मिळणाऱ्या मदतीसह पीकविमा, पीककर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे ई-पीक पाहणी गरजेची आहे. यासाठी काही अडचण असल्यास ग्राममहसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधत २४ जानेवारीपर्यंत ई- पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन केले