Nashik Traffic Update 
नाशिक

Nashik Traffic Update | द्वारका-नाशिकरोड मार्ग वाहतुकीसाठी खुला; वाहनचालकांना मोठा दिलासा

Nashik Traffic Update | मुंबई नाका, वडाळा नाका मार्गावरील वाहतूक कोंडीचा ताण होणार कमी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):

द्वारका सर्कल येथून नाशिकरोडकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मार्गामुळे द्वारका परिसरातील नेहमीची वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली असून, वाहनचालकांना पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचा त्रासही वाचला आहे. शालिमार, सीबीएस परिसरातून आता द्वारकामार्गे थेट नाशिकरोडला जाता येणार असल्याने प्रवासाचे अंतर आणि वेळ वाचण्याची अपेक्षा आहे.

द्वारका सर्कल येथून नाशिकरोडकडे जाणारा मार्ग बंद असल्यामुळे वाहनचालकांना मुंबई नाका, वडाळा नाका चौक आणि सह्याद्री हॉस्पिटलमार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत होता. या मार्गावर आधीच वाहनांची मोठी वर्दळ असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत होती.

विशेषतः सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असत. त्यामुळे वाहनचालकांना अतिरिक्त वेळ खर्च करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर द्वारका ते नाशिकरोड मार्ग सुरू होण्याची प्रतीक्षा वाहनचालकांकडून केली जात होती.

आता दोन्ही दिशेचे मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध झाल्याने द्वारका परिसरातील वाहतुकीला पर्यायी व्यवस्था मिळाली आहे. विशेषतः शालिमार आणि सीबीएसकडून नाशिकरोडला जाणाऱ्या वाहनचालकांना मुंबई नाका आणि वडाळा नाका मार्गे वळसा घालण्याची गरज भासणार नाही, ज्यामुळे वाहतूक कोंडीचा ताण कमी होऊन वाहनचालकांचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे.

भुयारी मार्गाचे काम आणि वाहतूक नियोजन

  • मार्ग खुला: द्वारका सर्कलपासून नाशिकरोडकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, काठे गल्लीतून नाशिक शहराच्या दिशेने येणारा मार्ग यापूर्वीच सुरू करण्यात आला आहे.

  • वाहतूक विभाजनाचा फायदा: दोन्ही बाजूंनी मार्ग सुरू झाल्याने वाहनांची विभागणी होऊन मुख्य चौकातील गर्दी कमी होण्यास हातभार लागेल. याचा प्रामुख्याने दुचाकी, चारचाकी आणि खाजगी प्रवासी वाहनांना फायदा होईल.

  • पोलिसांचे आवाहन: द्वारका सर्कल येथे काठे गल्ली ते सारडा सर्कलदरम्यान भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आणि भुयारी मार्गाच्या कामाच्या ठिकाणी सावधानी बाळगणे आवश्यक असल्याचे वाहतूक शाखा युनिट क्र. ५ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांनी स्पष्ट केले आहे.

  • दिलासादायक बदल: नाशिकरोड, उपनगर आणि शहराच्या मध्यवर्ती भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गावरील वाहतूक कोंडीत अडकून पडण्याची वेळ आता कमी येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT