Diwali Lighting Pudhari
नाशिक

Nashik Diwali Shopping | दीपाोत्सवानिमित्त बाजारपेठेत लखलखाट

Nashik Diwali Shopping | प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर विविधांगी दिव्यांनी सजले आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : अंजली राऊत
प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर विविधांगी दिव्यांनी सजले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेसह एम. जी. रोड, शालिमार येथे विविध रंगांच्या आकर्षक रोषणाईची लायटिंग ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्यापाऱ्यांनीदेखील दुकानांवर आणि रस्त्यावर विलोभनीय लायटिंग केली आहे. रात्री बाजारपेठेचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.

मेनरोड, शालिमार, भद्रकाली, रविवार कारंजा, नाशिकरोड, जेलरोड, देवळाली कॅम्प, आडगाव आणि कॉलेज रोड या प्रमुख व्यापारी भागात दिव्यांची आणि इलेक्ट्रॉनिक लाइट्सचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत आहेत. पारंपरिक पणत्यांसोबतच यंदा बाजारात चायनीज लाइट्ससोबत भारतीय लायटिंगलादेखील मागणी आहे.

यात एलईडी माळ, आरजीबी पिक्सल लाइट्स आणि वेगवेगळ्या आकारांतील लायटिंग मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली आहे. लक्ष वेधून घेणारी लायटिंग खरेदीसाठी ग्राहक सायंकाळच्या वेळी सहकुटुंब बाहेर पडत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक लाइट्सच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी दिसत आहे. या गर्दीमुळे व्यापाऱ्यांत आनंदाचे वातावरण असून, यंदा दिवाळीचा व्यापार अधिक चांगला होण्याची आशा विक्रेत्यांना आहे.

असे आहेत नवीन प्रकार


यंदाच्या दिवाळीसाठी वॉटरप्रूफ एलईडी माळ, रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या डिस्को लाइट्स आणि घराच्या भिंतीवर लक्ष्मीची पावले उमटवणारे लेजर लाइट्स ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. घराबाहेरचे रंगीबेरंगी फिरते लाइट्सदेखील यंदा बाजारात विविध डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत.

"बाजारात चीनी आकाशकंदील उपलब्ध असले तरी, घरांची सजावट करण्यासाठी भारतीय लायटिंगला ग्राहकांकडून पसंती आहे. यात 'शुभ दीपावली' नावाच्या आकर्षक लायटिंगलाही मागणी आहे. भारतीय संस्कृती आणि सणांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या लायटिंगमुळे घराच्या सजावटीला वेगळेपण प्राप्त होते. त्यामुळे यंदा दिवाळी खरेदीत भारतीय लायटिंगला ग्राहकांचे विशेष पसंती आहे."
— अमोल वरखेडे, इलेक्ट्रिक वस्तू विक्रेता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT