Jail Pudhari
नाशिक

Dipali Pawar Death Case | दिपाली पवार आत्महत्या प्रकरणात मोठी घडामोड; पतीच्या पोलीस कोठडीत 11 ऑक्टोबरपर्यंत वाढ

Dipali Pawar Death Case | पतीच्या कोठडीत 11 ऑक्टोबरपर्यंत वाढ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आरोग्यसेविका दिपाली पवार आत्महत्या प्रकरणात पती संशयित अनिल सोन्या बापू पवार याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. शुक्रवारी (दि. ९) झालेल्या सुनावणीदरम्यान दिपाली यांच्या मोबाईलचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) काढण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. हा सीडीआर कोणाच्या आदेशवरून काढण्यात आला, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.

दिपाली यांच्या वडिलांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पती अनिल पवार तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ करीत होता. या त्रासाला कंटाळून दिपाली यांनी ४ ऑक्टोबर रोजी विषारी औषध प्राशन केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

सुनावणीदरम्यान दिपाली यांच्या बाजूने अॅड. मयूर काळे यांनी युक्तिवाद केला. मोबाईलचा सीडीआर काढण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी प्रकरणातील आरोपींच्या अनुषंगाने तपास करण्याची गरज अधोरेखित केली.

संशयिताविरोधात पुरावे गोळा करून त्याला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दिपाली यांच्या मुलाने चित्रित केल्याचा दावा असलेला आणि छळासंदर्भातील कथित दृश्य असलेले व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

मात्र, या व्हिडिओची सत्यता अद्याप पडताळण्यात आलेली नाही. त्यामुळे सीडीआर, व्हिडिओ आणि अन्य पुराव्यांची सत्यता तपासून प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT