CJP Protest Delhi Pudhari
नाशिक

Dindori Protest | "दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्जचा दिंडोरीत तीव्र निषेध! सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे आंदोलन, शहरात कडकडीत बंद"

Dindori Protest | दिल्ली येथील जंतर मंतरवर नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा

दिल्ली येथील जंतर मंतरवर नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा दिंडोरीत सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे.

दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दिंडोरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवत सहभाग नोंदवला.

आंदोलनात युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील आव्हाड, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, शहराध्यक्ष रोहित जंगम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नरेश देशमुख, तौसिफ मनियार, मनोज ढिकले,

तालुकाप्रमुख अमोल उगले, शहराध्यक्ष अभिजित राऊत, माकपचे आप्पा वटाणे, नितीन बोधारे, नामदेव राऊत, मधुकर पगारे, सुहास देशमुख, शांताराम चारोस्कर, अरुण गायकवाड, सचिन धुळे, अभिजित शिंदे, उत्तम उगले, बाळासाहेब बेंडकुळे, बुरौद्दीन शेख उपस्थित होते.

निफाड चौफुलीवर आज मविआचा 'रास्ता रोको'

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आपल्या न्याय्य हक्कांसाठी सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे शुक्रवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता निफाड चौफुली येथे 'रास्ता रोको' आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या घटक पक्षांच्या वतीने हे जाहीर निषेध आंदोलन होणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT