Death by Drowning in a Lake Pudhari
नाशिक

Drowning Death | दिंडोरी तालुक्यात शोककळा! दोन वेगवेगळ्या घटनांत 4 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

Drowning Death | दिंडोरी तालुक्यातील चार शाळकरी विद्यार्थ्यांचा दोन वेगवेगळ्या घटनेत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या.

पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी तालुक्यातील चार शाळकरी विद्यार्थ्यांचा दोन वेगवेगळ्या घटनेत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. पहिली घटना दिंडोरी तालुक्यातील कादवा नदीत तर दुसरी घटना निफाड तालुक्यातील एका बंधाऱ्यात घडली. याबाबत दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. चार दिवसांपूर्वीच सहा विद्यार्थ्यांच्या विहिरीत कार पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना मंगळवारी दोन घटनांत चार मुले बुडून मृत्युमुखी पडली.

कादवात आंघोळीला गेलेले दोघे बुडाले

तालुक्यातील परमोरी येथील दोन मुले दुपारच्या सुमारास कादवा नदीपात्रात आंघोळीसाठी गेले असताना त्यांचा कादवा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. समीर रावसाहेब गांगोडे (१४) व यश राहुल पगारे (१२) अशी या मुलांची नावे आहेत. ही दोन्ही मुले वरखेडा येथील शाळेत शिकत होते. घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढले. दोन्ही मृतदेह वणी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. सध्या उन्हाळा सुरू असून, तालुक्यातील अनेक भागात पाट, नदी किंवा पाण्याचा स्रोत असलेल्या ठिकाणी मुले आंघोळीसाठी जात असतात. पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

दोन मुलांचा तलावात पाय घसरून मृत्यू

रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. सध्या उन्हाळा सुरू असून, तालुक्यातील अनेक भागात पाट, नदी किंवा पाण्याचा स्रोत असलेल्या ठिकाणी मुले आंघोळीसाठी जात असतात.

पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कुटुंब नवस फेडण्याच्या कामात मग्न असताना ओमकार सुनील फटांगडे (१३) व रुद्र गणेश जाधव (१३) हे खेळत असताना कॉर्टर पाझर तलावात पाय घसरून पडले. यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. त्यांच्यावर मोहाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT