Internet shutdown impact | इंटरनेट बंद पडले तर? 
नाशिक

4G Network Expansion | हजारो नागरिकांना इंटरनेट सुविधेचा लाभ

4G Network Expansion | खा. भास्कर भगरे यांचा पाठपुरावा ; 88 गावांमध्ये सेवा सुरू

पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील आदिवासी, डोंगराळ व अतिदुर्गम भागातील नागरिकांना स्वातंत्र्यानंतरही मोबाइल नेटवर्कच्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत होते. खा. भास्कर भगरे यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन दिंडोरी मतदारसंघातील दुर्गम भागांना मोबाइल नेटवर्क उपलब्ध करून देण्याची ठोस मागणी केली होती.

या मागणीला यश आले असून, मतदारसंघातील 70 मोबाइल टॉवर्स कार्यान्वित करण्यात आले असून, त्याद्वारे 88 दुर्गम गावांमध्ये 4G मोबाइल नेटवर्क सेवा उपलब्ध झाली आहे. यामुळे हजारो नागरिकांना प्रथमच दर्जेदार मोबाइल व इंटरनेट सेवेचा लाभ मिळत आहे. वैद्यकीय आणीबाणी, कायदा-सुव्यवस्था, विद्यार्थ्यांचे शिक्षण, शासकीय योजनांचा लाभ तसेच रोजगारासाठी बाहेरगावी गेलेल्या नागरिकांचा कुटुंबाशी संपर्क अशा अनेक बाबींमध्ये नेटवर्कअभावी मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या.

या गंभीर प्रश्नाची दखल घेत खा. भगरे यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री शिंदे यांची दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन दिंडोरी मतदारसंघातील दुर्गम भागांना मोबाइल नेटवर्क उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यासाठी केंद्रीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत हा विषय प्राधान्याने मांडला. खा. भगरे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, केंद्रीय दूरसंचार विभागाच्या डिजिटल भारत निधी योजनेअंतर्गत आणि बीएसएनएलच्या माध्यमातून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात फोर-जी नेटवर्क विस्ताराला मोठी गती मिळाली आहे.

बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक हरिंदर कुमार यांनी खा. भगरे यांना पाठविलेल्या पत्रानुसार, मतदारसंघातील 70 मोबाइल टॉवर्स कार्यान्वित करण्यात आले असून, त्याद्वारे 88 दुर्गम गावांमध्ये 4G मोबाइल नेटवर्क सेवा उपलब्ध झाली आहे. दुर्गम आणि नेटवर्कविहीन भागांसाठी आणखी 55 नवीन मोबाइल टॉवर्सना मंजुरी देण्यात आली आहे. या टॉवर्ससाठी आवश्यक जागा व इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच काम तातडीने सुरू करण्यात येणार असून, मार्च 2027 पर्यंत उर्वरित सर्व दुर्गम गावांपर्यंत 4G नेटवर्क पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

"दिंडोरी मतदारसंघातील एकही गाव विकासाच्या प्रवाहापासून दूर राहणार नाही. शिक्षण, आरोग्य, रोजगार, डिजिटल सेवा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोबाइल नेटवर्क अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक दुर्गम गावात दर्जेदार नेटवर्क सुविधा उपलब्ध होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील."
- खा. भास्कर भगरे, दिंडोरी मतदारसंघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT