Accident Pudhari
नाशिक

Dindori Accident Case| दिंडोरी अपघात प्रकरणी चौकशी समिती नियुक्त

Dindori Accident Case | सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी नगरपंचायत हद्दीत शुक्रवारी (दि. ३) रात्री झालेल्या अपघाताची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सखोल चौकशीसाठी समिती नियुक्त केली असून, याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. या अपघातात इंदोरे (ता. दिंडोरी) येथील दरगोडे कुटुंबातील ६ शालेय विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी तसेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या बाबींचा सर्वंकष तपास करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त करण्यात आलेली आहे.

अपघात झालेल्या ठिकाणाची परिस्थिती, तेथील कामाची पद्धत, सुरक्षा उपाययोजना तसेच प्रशासनिक जबाबदाऱ्या या सर्व बाबींचा आढावा घेत अहवाल सादर करण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहेत.

समितीने अपघातस्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणे, संबंधित अधिकारी व कामगारांचे निवेदन नोंदविणे, कामाच्या गुणवत्तेचा आणि सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.

यासह भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नये, त्या टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्याची जबाबदारीही या सोपविण्यात आली आहे. समितीवर अहवाल ७ दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

संबंधित नगरपंचायतीने या चौकशीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे, नोंदी व सहकार्य उपलब्ध करून द्यावे, असेही आदेशात नमूद केलेले आहे. या घटनेमुळे रस्ते कामांदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्रशासनाने या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. ही समिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त श्याम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त केल्याचेही आदेशात म्हटले या समितीने आपला सविस्तर आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT