Simhastha Kumbh Mela Nashik Pudhari News Network
नाशिक

Nashik Kumbh Mela | समतेचा, श्रद्धेचा, पर्यावरण रक्षणाचा कुंभ होणार

Nashik Kumbh Mela | मुख्यमंत्री फडणवीस : कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक शिखर परिषदेचा समारोप

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळा डिजिटल कुंभ करायचा आहे. त्याची चांगली तयारी सुरू आहे. कमी काळात सगळी कामे अधिक गतीने पूर्ण करण्यात येत आहेत, भेदभावविरहित भारतीय संस्कृतीच्या आस्थेचा सवांत मोठा आविष्कार आणि अर्थव्यवस्थेला गती देणारा समता आणि श्रद्धेचा मेळा म्हणजे कुंभमेळा आहे. कुंभमेळ्यात पर्यावरण संवर्धनासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील.

डिजिटल आणि तंत्रज्ञानाचा सर्वाधिक उपयोग असणारा हा कुंभ असेल. प्रत्येकाला अध्यात्मची आनंददायी अनुभूती मिळावी यासाठी सर्व सुविधा देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नाशिक येथील हॉटेल वाज येथे बुधवारी (दि.६) आयोजित कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक शिखर परिषद २०२६ च्या समारोप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी हे बोलत होते.

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील विकासकामांची माहिती दिली ते म्हणाले, नासिक कृयी, धार्मिक पर्यटन क्षेत्रात उसोसर असण्यासोबत उत्तर महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन आहे. जिल्ह्यात कुंभमेळ्याच्या निमित्ताने ३५ हज्जार कोर्टीची विकासकामे करण्यात येत आहेत. सते, विमानतळ, रेल्वे, डिजिटल पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे.

नाशिक समृद्धी महामार्गाद्वारे जोडले गेले आहे. नाशिक ते चेजई, नाशिक ते वाढवण, नाशिक रिंग रोड अशा मागाँमुळे प्रगतीला अधिक चालना मिळेल. एनएमआरडीए विकास आराखड्यामुळे नाशिक परिसरातील पायाभूत सुविधाचा विकास होईल. या सर्व कामांमुळे नाशिक मंत्र, तंत्र आणि यंत्रभूमी म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जिल्ह्यातील विकासासोबत समृद्ध वारशाची जपणूक करण्यात येईल, असेही डॉ. गेडाम म्हणाले.

उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम आयोजनामागची भूमिका विशद केली. व्योग विभागाच्या माध्यमातून उद्योगांना सुलभ धोरण राज्य शासनाने मेतले असल्याची माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, राज्यातील विविध विल्ह्यांत आयोजित कार्यक्रमाद्वारे एकूण ९६ हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले, त्यापैकी १२ हजार कोटींचे करार नाशिकसाठी करण्यात आले.

राज्यातील करारांची एकूण फलश्रुती ७२ टके आहे. कुंभउद्योग संगमाच्या माध्यमातून ३०० पेक्षा अधिक आणि १४ हजार कोटीपेक्षा अधिक रकमेचे करार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक धार्मिक, सांस्कृतिक शहर, वाइन कॅपिटलसोबत औद्योगिक शहर म्हणून ओळखले जावे असा प्रयत्न असून, उद्योग उभे राहण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी, बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले पुष्पक विमान प्रतिकृती देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाला आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, हिरामण खोसकर, एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT