सुरेश दामसे यास झोळीतून रुग्णवाहिकेकडे आणताना ट्रेकर्स.  Pudhari
नाशिक

Harishchandragad Accident | महाशिवरात्रीनिमित्त दर्शनाला जाताना काळाचा घाला: हरिश्चंद्रगड येथे कड्याचा दगड कोसळून भाविकाचा मृत्यू

Ahilyanagar Accident News | आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील भाविक

पुढारी वृत्तसेवा

Devotee Death Harishchandragad

ओतूर : सह्याद्री पर्वतरांगांतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असलेल्या हरिश्चंद्रगडावर दुर्दैवी घटना घडली. कड्यावरील सैल दगड अचानक कोसळून एका भाविकाच्या डोक्यात व पाठीवर लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १५) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली असून सुरेश किसन दामसे (वय ३५, रा. घोडेगाव, ता. आंबेगाव) असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकाचे नाव आहे.

भाविकांचा एक गट गड परिसरात महाशिवरात्रीनिमित्त देवदर्शन व फिरण्यासाठी गेला होता. यावेळी वरील कड्याच्या भागातून अचानक दगड कोसळला. मोठा दगड थेट दामसे या भाविकाच्या डोक्यात व पाठीवर लागल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी त्यास तब्बल ५ किलोमीटर चादरीची झोळी करून पायवाटेने खाली आणून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, ट्रेकर्स व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह खाली आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी पाठविण्यात आला.

या घटनेमुळे गडावर आलेल्या भाविक व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डोंगरकड्याजवळ जाताना काळजी घेणे, सैल दगड असलेल्या भागात न जाणे तसेच प्रशासनाने सुरक्षिततेच्या उपाययोजना वाढवाव्यात, अशी मागणी व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT