Separate Railway Zone : मराठवाडा, विदर्भ, खानदेशसाठी स्वतंत्र रेल्वे झोन करा Pudhari File Photo
नाशिक

Adv Nitin Pandit Nashik Railway | नाशिक-पुणे थेट रेल्वे मार्गासाठी रेटा

Adv Nitin Pandit Nashik Railway | शिर्डीऐवजी सिन्नर -चाकण मार्ग कायम ठेवण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

प्रस्तावित नाशिक-पुणे रेल्वेमार्ग शिर्डीमार्गे वळविण्यात आल्याने प्रवासाचे अंतर आणि वेळ वाढणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि व्यापारी विकासासाठी नाशिक-पुणे थेट रेल्वेमार्गाची नितांत गरज असल्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. विविध संघटनांनी - यासाठी रेटा लावला आहे.

नाशिक-शिर्डी-दौंड-पुणे असा - मार्ग झाल्यास नाशिक ते पुणे अंतर सुमारे ८० किलोमीटरने वाढणार आहे. नाशिक-सिन्नर-राजगुरूनगर-चाकण या जुन्या प्रस्तावित मार्गाने थेट रेल्वे जोडल्यास वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होणार आहे.

शिर्डी मार्गाच्या प्रस्तावामुळे सिन्नर आणि संगमनेरसारख्या महत्त्वाच्या भागांकडे दुर्लक्ष होणार आहे. यापूर्वी जुन्या मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया, सर्वेक्षण आणि प्रशासनिक कामे मोठ्या = प्रमाणात झाली होती. त्यामुळे मार्ग बदलल्यास आधी झालेला खर्च आणि प्रक्रिया व्यर्थ जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवीन रेल्वेमार्गासाठी जमीन अधिग्रहण करताना महाराष्ट्र जमीन - महसूल कायदा तसेच केंद्र सरकारच्या भूसंपादन कायद्यानुसार प्रक्रिया केली जाते. यात जमिनीची मोजणी, मालकी - हक्क निश्चित करणे, सातबारा उतारे - तपासणे आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा लागतो. शिर्डी मार्गावर - मोठ्या प्रमाणात शेतकरी बाधित होणार असल्याने भविष्यात भूसंपादनाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

२०२० मध्ये नाशिक, सिन्नर, संगमनेर मार्गासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन प्रक्रिया झाली होती. अनेक सव्र्व्हे नंबर निश्चित झाले होते आणि मोठा खर्चही झाला आहे. काही समितीनेही हा मार्ग योग्य असल्याचे सांगितले होते. नवीन बदलामुळे नाशिककरांना अपेक्षित फायदा होणार नाही. -
राजेश फोकणे, प्रवासी वाहतूक संघटना
प्रशासनाने जाहीर केलेला नाशिक-शिर्डी मार्ग प्रत्यक्षात कागदावरच राहण्याची शक्यता आहे. या भागात मोठ्या प्रमाणात शेतजमीन असल्याने भूसंपादनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जुना मार्गच योग्य असून, तोपर्यंत नाशिक-कल्याण मार्गावरील जी रेल्वे सेवा बंद पडली आहे ती सुरू ठेवावी.
अॅड. नितीन पंडित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT