राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहिल्या. (source- RBI)
नाशिक

Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आज देणार अधिकृत निमंत्रण

Nashik Simhastha Kumbh Mela | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह महापौर हिमगौरी आहेर-आडके भेट घेणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येत्या ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती लाभावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडून राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात येणार आहे. यावेळी आदिवासींनी तयार केलेल्या शबरी नॅचरल्स ब्रँडमधील वस्तू भेट दिल्या जाणार आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्याची पहिली पर्वणी दि. २ ऑगस्ट २०२७ रोजी होणार असून, त्यापूर्वी ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ध्वजारोहण सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण देण्यासाठी शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन आणि महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्यासह कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांचा या शिष्टमंडळात समावेश असेल. राष्ट्रपती कार्यालयाकडून भेटीसाठी दुपारी १२ ची वेळ देण्यात आल्याची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT