ठळक मुद्दे
स्वप्नाची पूर्तता करण्याची संधी क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे १४ ते १८ ऑगस्ट दरम्यान
ठक्कर डोम येथे होणाऱ्या प्रॉपर्टी एक्स्पो 'नम: नाशिक - प्रॉपर्टीचा महाकुंभ'चे भूमीपूजन
नाशिक शहराची कनेक्टीव्हिटी वाढणार : नाशिककरांसाठी लकी ड्रॉ देखील असणार
नाशिक : नाशिकमध्ये स्वत:चे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. याच स्वप्नाची पूर्तता करण्याची संधी क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे १४ ते १८ ऑगस्ट दरम्यान आयोजित 'नम: नाशिक - प्रॉपर्टीचा महाकुंभ' या गृहप्रदर्शनात मिळणार असल्याचे प्रतिपादन क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी केले. ठक्कर डोम येथे होणाऱ्या प्रॉपर्टी एक्स्पो भूमिपूजन समारंभात ते पत्रकारांशी बोलत होते.
प्रदर्शनाचे समन्वयक ऋषिकेश कोते म्हणाले, या प्रदर्शनामध्ये ८० हून अधिक विकासकांचे ५०० पेक्षा अधिक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये शहरातील विविध भागातील फ्लॅट्स, प्लाॅट्स, दुकाने, ऑफिसेस यांचा समावेश आहे. यासोबतच आघाडीच्या गृहकर्ज देणाऱ्या संस्थादेखील प्रदर्शनात सहभागी होत आहेत.
प्रदर्शनाचे समन्वयक नरेंद्र कुलकर्णी म्हणाले, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पायाभूत सुविधांमध्ये बरीचशी सुधारणा होणार असून, नाशिक शहराची कनेक्टीव्हिटी देखील वाढणार आहे. रस्ते ,रेल्वे व हवाई सेवेद्वारे याआधीच नाशिक अन्य शहरांशी चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. आगामी कुंभमेळ्यामुळे नाशिक हे अधिक प्रभावीपणे देशाशी व जगाशी जोडले जाईल. औद्योगिक, शैक्षणिक, धार्मिक व कृषिपूरक उद्योगाच्या अनेक संधी नाशिकमध्ये उपलब्ध असल्याने रोजगार व व्यवसायाच्या अनेक संधी नाशिकमध्ये असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा, आयपीपी कृणाल पाटील, उपाध्यक्ष उदय घुगे, अनिल आहेर, अंजन भालोदिया, कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव सचिन बागड, हंसराज देशमुख, एक्सपो कमिटीचे प्रमुख मनोज खिवंसरा, मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, सागर शाह, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शाह, वृषाली हिरे, दीपाली बिरारी आदी प्रयत्नशील आहेत.
भविष्यातील नाशिकसाठीच्या अनेक विकासात्मक योजनांमुळे सर्वांगाने आधीच महत्वपूर्ण असलेल्या नाशिकचे महत्त्व अजूनच वाढणार आहे. विविध क्षेत्रातील उपलब्ध संधी तसेच राहणीमानाचा दर्जा यासोबतच उत्तम हवामान, मुबलक पाणी यामुळे नाशिकमध्ये केलेली रिअल इस्टेटमधील गुंतवणूक भविष्यात 'फायदे का सौदा' ठरणार आहे.गौरव ठक्कर, अध्यक्ष, नाशिक क्रेडाई मेट्रो
'हरित नाशिक' ही संकल्पना रूजविण्यासाठी प्रदर्शनस्थळी चारही दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. याकरिता प्रदर्शनस्थळी सेमिनार हॉलची उभारणी केली जाणार आहे. तसेच 'क्रेडाई गॅलरी'मध्ये तीन दशकांची साक्ष देणारे फोटो उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच प्रदर्शनस्थळी येणाऱ्या नाशिककरांसाठी लकी ड्रॉ देखील असणार आहे.