

नाशिक : क्रेडाई नाशिक मेट्रोची २०२५-२७ या वर्षासाठीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी गौरव ठक्कर यांची निवड करण्यात आली आहे तर, मानद सचिवपदी तुषार संकलेचा यांची निवड केली आहे. नूतन कार्यकारिणीमध्ये सात पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
शुक्रवारी (दि.११) एका हॉटेलमध्ये आयोजित बैठकीत निवड समितीचे प्रमुख जीतू ठक्कर व अनंत राजेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी विविध समित्यांचे १३ सहसमन्वयक व क्रेडाई विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर आणि सहसमन्वयक अजिंक्य नहार यांच्या १५ सदस्यांसोबत चर्चा करून ही निवड करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून क्रेडाई नाशिक मेट्रोच्या अध्यक्षपदाची धुरा कृणाल पाटील यांच्यावर होती. लवकरच पदग्रहण सोहळा आयोजित केला जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
अध्यक्ष - गौरव ठक्कर, मानद सचिव - तुषार संकलेचा, आयपीपी - कृणाल पाटील, कोषाध्यक्ष - श्रेणिक सुराणा, सहसचिव - सचिन बागड, नरेंद्र कुलकर्णी, ऋषिकेश कोते, हंसराज देशमुख. सदस्य - अनिल हैर, मनोज खिंवसरा, अंज भलोदिया, उदय घुगे आदींची निवड करण्यात आली.