ठळक मुद्दे
क्रेडाई नाशिक मेट्रोच्या 'नम: नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ'चे आज उद्घाटन
प्रदर्शनात ८० पेक्षा अधिक विकासकांचे ५०० पेक्षा जास्त पर्याय एकाच छताखाली
नाशिकमध्ये रिअल इस्टेटमधील गुंतवणूक भविष्यात 'फायदे का सौदा 'ठरणार
'Namah: Nashik Property Mahakumbh'
नाशिक : क्रेडाई नाशिक मेट्रोच्या 'नम: नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ'चे गुरुवारी (दि.१४) जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रदर्शनात ८० पेक्षा अधिक विकासकांचे ५०० पेक्षा जास्त पर्याय एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
उद्घाटन समारंभाप्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, शोभा बच्छाव, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, अॅड. राहुल ढिकले, राहुल आहेर, दिलीप बनकर, सुहास कांदे, हिरामण खोसकर, नितीन पवार, दिलीप बोरसे, सत्यजित तांबे व माजी खासदार हेमंत गोडसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रदर्शनाचे समन्वयक म्हणून ऋषिकेश कोते व नरेंद्र कुलकर्णी जबाबदारी सांभाळत आहेत. प्रदर्शन यशस्वीतेसाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा, एक्सपो कमिटीचे प्रमुख मनोज खिवंसरा, आयपीपी कृणाल पाटील, उपाध्यक्ष उदय घुगे, अनिल आहेर, अंजन भालोदिया, कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव सचिन बागड, हंसराज देशमुख, मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, सागर शाह, निशित अटल, सुशील बागड आदी प्रयत्नशील आहेत.
१४ ते १८ ऑगस्टदरम्यान नाशिकमधील ठक्कर डोम येथे आयोजित हे प्रदर्शन म्हणजे प्रगतीशील नाशिकमध्ये स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी आहे. भविष्यातील नाशिकसाठीच्या अनेक विकासात्मक योजनांमुळे सर्वांगाने आधीच महत्वपूर्ण असलेल्या नाशिकचे महत्व अजूनच वाढणार आहे. विविध क्षेत्रातील उपलब्ध संधी तसेच राहणीमानाचा दर्जा तसेच उत्तम हवामान, मुबलक पाणी यामुळे नाशिकमध्ये रिअल इस्टेटमधील गुंतवणूक भविष्यात 'फायदे का सौदा 'ठरणार आहे.गौरव ठक्कर, अध्यक्ष, क्रेडाई नाशिक मेट्रो
शहराची प्रगती व अर्थकारण यामध्ये बांधकाम व्यावसायिकांचा मोलाचा वाटा असून, एका गृह प्रकल्पामुळे अनेकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार तसेच व्यवसायाच्या संधी मिळतात. या प्रदर्शनात शहरातील विविध भागांमधील फ्लॅट्स, प्लाॅट्स, दुकाने, ऑफिसेस यांचा समावेश आहे. आघाडीच्या गृहकर्ज देणाऱ्या संस्थादेखील प्रदर्शनात सहभागी होत आहेत. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत असून विविध आकर्षक ऑफर्ससाठी प्रदर्शनास भेट द्यावी.ऋषिकेश कोते, समन्वयक
आगामी कुंभमेळ्यामुळे नाशिक हे अधिक प्रभावीपणे देशाशी व जगाशी जोडले जाईल. अनेक प्रस्तावित पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे नाशिककडे येण्याचा ओघ निश्चितच वाढणार आहे. औद्योगिक, शैक्षणिक, धार्मिक व कृषिपूरक उद्योगाच्या अनेक संधी नाशिकमध्ये उपलब्ध असल्याने, रोजगार व व्यवसायाच्या अनेक संधी नाशिकमध्ये आहेत. त्यामुळे आगामी कालावधीत घरांच्या किंमती वाढू शकतात. त्यामुळे रियल इस्टेटमध्ये गुंतवणुकीसाठी सध्या पोषक वातावरण आहे.नरेंद्र कुलकर्णी, समन्वयक