HSC Board Exam 2026  Pudhari
नाशिक

HSC Board Exam | बारावीच्या परीक्षा अर्जांबाबत संभ्रम कायम! MCVC अन् ITI विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

HSC Board Exam | एमसीव्हीसी, आयटीआय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेच्या ऑनलाइन आवेदनपत्र प्रक्रियेला सुरुवात झाली असली, तरी एमसीव्हीसी, आयटीआय तसेच अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर ऑनलाइन एफवायज्युसी प्रणालीवर ज्यांचा डाटा उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांबाबत अद्याप संभ्रम कायम आहे.

पात्र विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र वेळेत भरले जावे, यासाठी मंडळाने स्वतंत्र प्रक्रिया स्पष्ट करून तातडीने कारवाईची मागणी होत आहे. राज्य मंडळाने दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी विभागीय मंडळांना पत्र पाठवून नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे २०२५-२६ मधील एफवायज्युसी डाटावरून पॉपअप करून भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन प्रणालीवर डाटा उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांची प्रक्रिया तुलनेने सुलभ झाली आहे.

मात्र, एमसीव्हीसी आणि आयटीआय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा तसेच एफवायज्युसी प्रणालीवर डाटा उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न कायम आहे. अशा विद्यार्थ्यांकडून आवश्यक माहिती घेऊन विभागीय मंडळांनी सॉफ्ट डाटा तयार करावा आणि तो मंडळाच्या पोर्टलवर अपलोड करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

मात्र, प्रत्यक्षात कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, माहिती कोणत्या पद्धतीने सादर करायची, आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण करायची आणि त्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) कधी जाहीर होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

'पात्र विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नका':

ऑनलाइन डाटा उपलब्ध नसल्यामुळे कोणताही पात्र विद्यार्थी बारावीच्या परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी मंडळाने तत्काळ ठोस व्यवस्था करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय रमेश सांगळे यांनी केली आहे. एमसीव्हीसी, आयटीआय आणि ऑनलाइन प्रणालीवर डाटा उपलब्ध नसलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व सुलभ सुविधा उपलब्ध करून द्यावी. संबंधित विद्यार्थ्यांची आवश्यक माहिती संकलित करून विभागीय मंडळांनी सॉफ्ट डाटा तयार करावा व तो तातडीने पोर्टलवर अपलोड करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही सांगळे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT