Goa SIR Success Special Intensive Revision 
नाशिक

SIR Campaign | "कॅन्टोन्मेंट हद्दीत मतदारांमध्ये एसआयआर मोहिमेबाबत संभ्रम! दुहेरी मतदारयादीमुळे बीएलओंवर वाढला ताण"

SIR Campaign | कॅन्टोन्मेंट हद्दीत मतदारांमध्ये एसआयआर मोहिमेबाबत संभ्रम

पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेमुळे देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील बीएलओ म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांवर प्रचंड ताण आला असून, मतदारांमध्येही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाची स्वतंत्र मतदारयादी हे या संभ्रमाचे मुख्य कारण असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक नेते प्रमोद मोजाड यांनी व्यक्त केले.

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या स्थानिक निवडणुकांसाठी प्रशासनाकडून स्वतंत्र वॉर्डनिहाय मतदारयादी तयार केली जाते. तर लोकसभा - विधानसभा निवडणुकांसाठी वेगळी मतदारयादी आहे. नगर परिषद, महापालिकेत दोन्हीसाठी एकच यादी असते, मात्र कॅन्टोन्मेंटमध्ये दुहेरी यादी असल्याने एसआयआरचे काम गुंतागुंतीचे झाले आहे.

'आमचे नाव कोणत्या यादीत आहे?', 'पुन्हा फॉर्म का भरायचा?' अशा प्रश्नांचा भडीमार शिक्षकांवर होत आहे. एका शिक्षकाकडे सरासरी १२-१५०० मतदारांची जबाबदारी आहे. त्यात शाळा सुरू असल्यामुळे अध्यापन आणि एसआयआरची दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत आहे. ग्रामीण भागात काम दिल्यामुळे प्रवासाचा ताणही वाढला आहे.

"कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मतदारयादीची व्यवस्था इतर स्थानिक स्वराज्य संस्थांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे मतदारांचा गैरसमज होत आहे. प्रशासनाने स्वतंत्र जनजागृती मोहीम राबवावी. बीएलओ शिक्षकांना अतिरिक्त मनुष्यबळ आणि तांत्रिक सुविधा द्याव्यात, जेणेकरून शिक्षकांवरील ताण कमी होईल."
- प्रमोद मोजाड, स्थानिक शिवसेना नेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT