CM Warns Action Over Delays in Singhastha Development Works Admin
नाशिक

Singhastha Development Works-दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा; ३४ हजार ७३२ कोटींच्या विकास आराखड्याला गती देण्याचे निर्देश

CM Warns Action Over Delays in Singhastha Development Works- सिंहस्थाच्या संथ कामांवर मुख्यमंत्र्यांची नाराजी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक / मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीतील कामांचा वेग समाधानकारक नसल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. कुंभमेळ्याची तारीख निश्चित झाली असून, आता कामे पुढे ढकलण्याची वृत्ती खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराच अधिकाऱ्यांना देताना ३४ हजार ७३२ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यातील सर्व कामे नियोजित वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२७संदर्भात आढावा बैठक पार पडली. यात त्यांनी कुंभमेळ्याच्या तयारीचा विभागनिहाय आढावा घेतला. कामांमध्ये अपेक्षित गती नसल्याचे सांगत, त्यांनी संबंधित यंत्रणांना तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

मुख्यमंत्री म्हणाले की, सध्याची कुंभमेळ्याच्या कामांची स्थिती समाधानकारक नाही. प्रत्येक विभागाने अधिक वेगाने आणि समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. बैठकीत दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी तातडीने करावी. एक महिन्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार असून, त्यावेळी कामांमध्ये गुणात्मक आणि प्रत्यक्ष प्रगती दिसली पाहिजे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजाविले. बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आडके-आहेर, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

१२ कोटी भाविकांसाठी सुविधांचे नियोजन नाशिक

4 सिंहस्थ व्यवस्था, निवास, स्वच्छता, कुंभमेळा आपत्ती व्यवस्थापन आणि सिंहस्थ कुंभमेळ्यात सुमारे १२ कोटी भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन, वाहतूक डिजिटल सुविधांचे नियोजन बैठकीत सादर करण्यात आले. नाशिक रिंगरोड, साधुग्राम उभारणी, रेल्वेस्थानकांचा विकास, ४,५०० विशेष एसटी बसेसची व्यवस्था तसेच मोठ्या प्रमाणावरील पार्किंग सुविधांची कामे वेगाने पूर्ण करण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला.

'डिजिटल कुंभ'वर भर सिंहस्थ कुंभमेळा

आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी 'डिजिटल कुंभ' संकल्पना राबविण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), 'कुंभदूत' एआय सहायक, डिजिटल द्विन, स्मार्ट पार्किंग, हरविलेल्या व्यक्तींचा शोध आणि एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून गर्दी व सुरक्षेचे व्यवस्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

कामांसाठी मार्च २०२७ चा अल्टिमेटम'

भूसंपादन, रिंगरोड, साधुग्राम आणि अन्य महत्त्वाच्या नागरी सुविधा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करून, एप्रिल २०२७ मध्ये त्या प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. कुंभमेळा स्वच्छ, हरित आणि प्लास्टिकमुक्त करण्यासाठी हजारो तात्पुरती शौचालये, कचराकुंड्या, बदल खोल्या तसेच मोठ्या प्रमाणात स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष पथके, स्वयंसेवक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT