नाशिक : आढावा बैठकीप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, मंत्री छगन भुजबळ आदी. pudhari news network
नाशिक

CM Fadnavis : नवीन रिंग रोड, ‘साधुग्रामचे काम पूर्ण करा’

मुख्यमंत्र्यांचे आदेश : सिंहस्थ पायाभूत सुविधा कामांचा घेतला आढावा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या-साठीच्या पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नाशिकमधील नवीन रिंग रोडचे काम पूर्ण करण्याबरोबरच साधुग्राम, टेंटसीटीसाठीची भूसंपादनाची कामेही गतीने पूर्ण करण्यात यावीत, असेही आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नाशिकमधील नवीन रिंगरोडचे काम पूर्ण करण्याबरोबरच साधूग्राम, टेंटसीटीसाठीची भूसंपादनाची कामेही गतीने पूर्ण करण्यात यावीत असेही आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे शनिवारी (दि.४) नाशिक, त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पणनमंत्री जयकुमार रावल, मुख्य सचिव राजेशकुमार, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला आदी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सादरीकरणाद्वारे नियोजनाची माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त करिश्मा नायर उपस्थित होते. गर्दीचे नियोजन, कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे तसेच रस्त्यांची व मलनि:स्सारणाची कामे वेगाने पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले.

तयार होणाऱ्या सुविधा या दीर्घकालीन असाव्यात असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तर उपमुख्यमंत्री पवार यांनी, कुंभमेळ्यासाठीची सर्व कामे दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे. पोलिसांच्या निवासव्यवस्थेसही प्राधान्य द्यावे.

मंत्री भुजबळ म्हणाले, कुंभमेळा कालावधीत व नेहमीसाठीही नदीपात्रातील पाणी शुद्ध राहील यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. मंत्री भुसे म्हणाले, अनेक तीर्थक्षेत्रे कुंभमेळ्याच्या परंपरेशी जोडलेली असल्याने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जवळपासच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांनाही गती देण्यात यावी. मंत्री महाजन म्हणाले, कुंभमेळ्यापुर्वी रस्त्यांची तसेच मलनिस्सारणाची कामे पूर्ण करण्यात यावीत.

या कामांबाबत दिले मुख्यमंत्र्यांनी आदेश

  • रामकुंडात आणि नेहमीसाठीच नदीपात्रातील पाणी स्वच्छ राहील हे कटाक्षाने पहावे.

  • मलनि:स्सारणाची कामे प्राधान्याने हाती घेवून पूर्ण करण्यात यावीत.

  • विमानतळे आणि रेल्वे सुविधांची कामेही गतीने पूर्ण करावीत.

  • नाशिकमधील नवीन रिंग रोडचे काम त्वरित पूर्ण करावे. इतर रस्त्यांची कामेही त्वरित हाती घ्यावीत.

  • विविध आखाड्यांशी चर्चा करून त्यांच्या गरजेनुसार साधूग्राममध्ये सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

  • सीसीटीव्ही कॅमेरे प्रणाली केंद्रीकृत पद्धतीने तयार करण्यात यावी.

  • कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 'एआय'च्या विविध पर्यायांचा वापर करण्यात यावा.

  • 'मार्व्हल'चाही उपयोग करून घेण्यात यावा. पोलिसांच्या निवासासाठीची व्यवस्था प्राधान्याने करावी.

  • द्वारका सर्कल येथील कामे त्वरित पूर्ण करावी.

  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेव्दारे बस सेवेचे नियोजन करण्यात यावे.

  • वाहनतळांच्या ठिकाणी भंडारा/लंगरची व्यवस्था करावी.

Nashik Latest News

'डिजिटल कुंभ' संकल्पना राबवावी

कुंभमेळ्याच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी 'डिजिटल कुंभ' ही संकल्पना राबविण्यात यावी. प्रचार प्रसिध्दीसाठी स्वतंत्रपणे वेगळा आराखडा तयार करून नियोजन करण्यात यावे. कुंभमेळा कामांसंदर्भात कोणत्याही प्रकारची नकारात्मक प्रसिद्धी होत असल्यास संबंधित विभागांनी यासंदर्भातील वस्तूनिष्ठ खुलासा त्वरित संबंधित माध्यमांना द्यावा. कुंभमेळ्यासाठीच्या आवश्यक कामांसाठी जिल्हास्तरावरील नोकरभरतीलाही गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT