छायाचित्रकारांचा 'कार्यगौरव' आणि छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
नाशिक : नाशिक फोटोग्राफर्स असोसिएशन व दीपक बिल्डर्स यांच्या वतीने 'क्लिक उत्सव : उत्सव प्रतिमांचा' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील व्यावसायिक, प्रेस तसेच तरुण व्यावसायिक फोटोग्राफर्स स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
शनिवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी फोटोग्राफी क्षेत्रातील लॅब मालक, डिलर, फोटो मटेरीयल आणि असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या छायाचित्रकारांचा 'कार्यगौरव सन्मान' देऊन गौरवण्यात येणार आहे. दि. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता पुण्यातील प्रसिद्ध चित्रकार तथा मार्गदर्शक सचिन भोर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे.
फोटो प्रदर्शन ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत कुसुमाग्रज स्मारकातील छंदोमयी दालनात सर्वांसाठी नि:शुल्क खुले आहे. प्रदर्शनास भेट देणाऱ्यांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार असून बक्षीस देण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपले फोटो जगताप फोटो, ५१६, नवीन तांबट लेन, रविवार पेठ, नाशिक येथे जमा करायचे आहेत. दि. २५ सप्टेंबर फोटो जमा करण्यासाठी अंतिम मुदत आहे. या दोन दिवसीय कार्यक्रमाला छायाचित्रकारांनी भेट द्यावी, असे आवाहन नाशिक फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष संजय जगताप व सचिव नंदू विसपुते, किरण मुर्तडक, प्रताप पाटील, प्रशांत तांबट आदींनी केले आहे.
व्यावसायिक गट : 'उत्सव' महाराष्ट्रातील, विवाह सोहळा
प्रेस फोटोग्राफर : माझी गोदामाई (सौंदर्य किंवा प्रदुषण)
तरुण पिढीतील व्यावसायिक फोटोग्राफर्ससाठी : 'प्री-वेडिंग', सिनेमॅटिक व्हिडिओ आणि रिल्स