Cockroach Janata Party Pudhari
नाशिक

Cockroach Janata Party | मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी! कॉक्रोच जनता पार्टी (CJP) आक्रमक

Cockroach Janata Party | नाशिकमध्येही सीजेपी-युवा रस्त्यावर उतरणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणावरून (एसआयआर) निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ज्ञानेश कुमार यांनी येत्या ४८ तासांत राजीनामा न दिल्यास देशभर आंदोलन करण्याचा इशारा सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी दिल्याचे नमूद करतानाच नाशिक जिल्ह्यातही युवा कार्यकर्ते रस्त्यावर उतरून अभूतपूर्व आंदोलन करतील अशी माहिती नाशिक जिल्हा कॉक्रोच जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सीजेपीचे नॅशनल ऑर्गनायझेशन जॉइंट सेक्रेटरी अक्षय शिंदे, महाराष्ट्र राज्याचे प्रज्वल कसबे, सम्राट सोनावणे, यांच्यासह सदस्य अंजली साकपाळ, ज्योती मोरे यांनी दिली.
'एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित वृत्ताचा दाखला देत सीजेपीने निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांचा मुद्दा उपस्थित केला असून, सीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या १० महिन्यांत मतदार नोंदणी, नावे वगळणे, फॉर्म-६ मधील बदल, पश्चिम बंगालमधील मतदारांशी संबंधित अपील आणि गोव्यातील मतदार नोंदणी यासह विविध निर्णयांवर किमान १४ वेळा आक्षेप नोंदवले होते.

तसेच फॉर्म-६ मध्ये नवमतदारांकडून पूर्वीच्या एसआयआरमधील स्वतःचे अथवा पालकांचे नाव असल्याबाबत माहिती मागविणाऱ्या नव्या प्रश्नावरही आयुक्तांनी आक्षेप घेतल्याचे अहवालात नमूद आहे. या बदलामुळे प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांना अडथळे निर्माण होऊ शकतात, असा आक्षेप सीजेपीकडून नोंदवण्यात आला असून, हा तरुण मतदारांना त्यांच्या मतदानाच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचा डाव असल्याचे सीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सीजेपी करणार नाशिकमधील शाळांचीही तपासणी

कॉक्रोच जनता पार्टीकडून नाशिकमधील शाळांचीही तपासणी करून येथील सोयी सुविधांचा आढावा घेत शाळांमधील शैक्षणिक उणीवा सरकार समोर आणल्या जाणार आहे. त्यासाठी सीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचीही भेट घेतली असून त्यांचेही जिल्ह्यातील शाळा सुधारण्यासाठी सहकार्य असल्याचे सीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

नाशिक दौरा लांबणीवर

सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके हे गुरुवारी (दि. २४) नाशिक दौऱ्यावर येऊन येथील स्पर्धा परीक्षांर्थीची भेट घेणार होते. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तात्काळ दिल्ली गाठली असून निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा उघडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे दीपके यांचा नाशिक दौरा काही दिवसांसाठी लांबला असल्याची माहिती नाशिक येथील सीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT