मंत्री छगन भुजबळ यांचा राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला आहे.  Pudhari News Network
नाशिक

Chhagan Bhujbal : शेवट चांगला… पेढे वाटून नाशिकमध्ये जल्लोष

Nashik News । भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खातं

अंजली राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | राजभवनात छगन भुजबळ यांचा मंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा संपन्न झाला आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये एकमेकांना पेढे भरवून जल्लोष व्यक्त केला जातो आहे.

नाशिकमध्ये पेढे वाटून जोरदार जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

छगन भुजबळ यांची मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि अन्न व नागरी पुरवठा खातं त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं होतं. मात्र हेच खाते आता भुजबळ यांना देण्यात आले आहे. त्याचबरोबर नाशिकमध्ये पेढे वाटून जोरदार जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT