मंत्री छगन भुजबळ file photo
नाशिक

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांची प्रकृती आता स्थिर

अंजली राऊत

नाशिक: पुढारी ऑनलाईन डेस्क - महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना अचानक मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. छगन भुजबळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यासाठी या ठिकाणी आले होते. परंतु अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्याहून मुंबईत आणले. मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

भुजबळ यांची प्रकृती आता स्थिर 

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना ताप आला व घशाचा संसर्ग (infection) झाला. त्यामुळे त्यांना गुरुवार (दि.26) रोजी दुपारी पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा असल्याने त्यांच्यासह पुणे दौऱ्यावर आले होते. सकाळपासूनच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि अचानक ताप भरून आला. घशाचाही त्रास जाणवला. त्यामुळे तातडीने त्योना पुण्यावरून मुंबईला एअरलिफ्ट करुन आणले आहे. मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांची प्रकृती आता स्थिर आहे.

नोव्हेंबर - २०२२ मध्ये सुद्धा भुजबळ यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याने मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT