Crime News pudhari photo
नाशिक

Nashik Crime News | "प्रेम प्रकरणाचा संशय अन् मित्रांनीच रचला मृत्यूचा सापळा!; चांदवडमध्ये 19 वर्षीय शरद वाकचौरेचा विहिरीत फेकून खून"

Nashik Crime News | प्रेमप्रकरणाचा संशय; तरुणास मारहाण; विहिरीत फेकले, दोघांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

चांदवड : पुढारी वृत्तसेवा

प्रेम प्रकरणाच्या संशयातून १९ वर्षीय तरुणाची मारहाण करून विहिरीत फेकून खून केल्याची धक्कादायक घटना चांदवड तालुक्यातील तळेगावरोही शिवारात उघडकीस आली आहे. घटना घडून तब्बल दीड महिन्यानंतर पोलिसांच्या तपासात हा घातपात समोर आला. चांदवड पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

संशयिताना सोमवारी (दि.६) चांदवड न्यायालयात नेले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी दिली. खून झालेल्या तरुणाचे नाव शरद अशोक वाकचौरे (वय १९) असून, त्याचे वडील अशोक शिवाजी वाकचौरे (वय ४९) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित रोशन तुकाराम वाकचौरे (वय २७) व सचिन दत्तात्रय गाडे (वय २३) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन वाकचौरे याला त्याची मैत्रीण आणि शरद वाकचौरे यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्याच रागातून शरदचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला.

२१ मे २०२६ रोजी लक्ष्मण पानसरे यांच्या शेतातील ट्रॅक्टरचे डिझेल संपल्याचे कारण सांगून शरदला घटनास्थळी बोलावण्यात आले. तेथे रोशन वाकचौरे व सचिन गाडे यांनी त्याला पकडून जवळील अमोल आनंदा पानसरे यांच्या विहिरीत फेकून दिले.

घटनेनंतर सुरुवातीला चांदवड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, मृताचे वडील अशोक वाकचौरे यांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांना तपासादरम्यान हा घातपात असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT