चांदवड : पुढारी वृत्तसेवा
इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, चांदवड तालुक्याचा एकूण निकाल ९१.०३ टक्के लागला आहे. गतवर्षी निकाल ९४.६५ टक्के होता. त्याच्या तुलनेत यंदा निकालात ३.६२ टक्के घसरण झाली. यंदा तालुक्यातून परीक्षेसाठी ३,७५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३,७२५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले.
एकूण ३,३९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील काही शाळांनी ९५ टक्क्यांहून अधिक निकालाची नोंद केली आहे. डॉ. ना. का. गायकवाड विद्यालय उसवाड (९८.५०), माध्यमिक विद्यालय वागदर्डी (९८.२४), श्री के. एस. विद्यालय भोयेगाव (९८.१८), माध्यमिक विद्यालय कानमंडाळे (९७.५०), संत ज्ञानेश्वर विद्यालय वाहेगावसाळ (९७.२२), बी. एल. जाधव विद्यालय शेलू (९७.१४), जनता विद्यालय पिंपळद (९६.९६), श्री नेमिनाथ जैन विद्यालय (९६.८३) आणि माध्यमिक विद्यालय परसूल (९६.५५) या शाळांनी विशेष यश मिळविले. याशिवाय श्रीमती जे. आर. गुंजाळ विद्यालय ९३.८४), महात्मा फुले हायस्कूल दुगाव (९४.२१), जनता विद्यालय निमोण (९५.१७), ठाकरे जनता विद्यालय काजीसांगवी (९५.१६), जनता विद्यालय वडाळीभोई (९५.९०), नूतन विद्यालय भाटगाव (९३.५४), नूतन हायस्कूल बहादुरी (९२.८५) आणि माध्यमिक विद्यालय दरसवाडी-हिरापूर (९२) या शाळांचाही निकाल उल्लेखनीय ठरला.
११ शाळांची १०० टक्के निकालाची नोंद
तालुक्यातील ११ शाळांनी १०० टक्के निकालाची नोंद करत विशेष कामगिरी बजावली. यामध्ये जनता विद्यालय आसरखेडे, जनता विद्यालय काळखोडे, जनता विद्यालय शिंदे-भयाळे, माध्यमिक आश्रमशाळा पारेगाव, माध्यमिक विद्यालय राहुड, महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक विद्यालय चांदवड, जनता विद्यालय गणूर, जनता विद्यालय पुरी, इंग्लिश मीडियम स्कूल नेमिनगर चांदवड, एलजेडीके माध्यमिक आश्रमशाळा खेलदरी आणि कै. एन. बी. जाधव विद्यालय चांदवड या शाळांचा समावेश आहे.