Nashik News  
नाशिक

Nashik News | महिला ट्रॅफिक वॉर्डनला चिरडण्याचा सिडकोत प्रयत्न

Nashik News | गरवारे पॉइंट-पपया नर्सरी या रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाला अडविल्याच्या रागातून चालकाने ट्रॅफिक वॉर्डन व होमगार्ड यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

पुढारी वृत्तसेवा

सिडको : पुढारी वृत्तसेवा

गरवारे पॉइंट-पपया नर्सरी या रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाला अडविल्याच्या रागातून चालकाने ट्रॅफिक वॉर्डन व होमगार्ड यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला ट्रॅफिक वॉर्डन लक्ष्मी सोनवणे व महिला होमगार्ड शिंपी या एक्स्लो पॉइंट येथे रविवारी (दि. २२) सकाळी ड्युटीवर असताना एक्स्लो सर्कल येथून एक चारचाकी वाहन विरुद्ध दिशेने येत होते.

रस्त्याचे काम सुरू असल्याने व वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वॉर्डन यांनी चालकास वाहन थांबण्यास सांगितले. याचा राग आल्याने संबंधित चालकाने धमकी देत वाहन थेट त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.

मात्र, प्रसंगावधान राखत दोन्ही महिला कर्मचारी बाजूला झाल्याने सुदैवाने अनर्थ टळला. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर संबंधित कारचालकाविरोधात कामात अडथळा निर्माण केल्याचा सरकारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चुंचाळे पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT