नाशिक : धनराज माळी
महानगरपालिकांची निवडणुक आटोपत नाही तोच महापालिका निवडणुकीची धामधूम सुर झाली आहे. या धामधूमीत शासकिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारींवर निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीची जबाबदारी पाडण्यात गुंतले आहेत. त्यामुळे बहूतांश जण आपल्या कार्यालयात नसल्याने कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना भेटत नसल्याचे चित्र आहे. संबधित कार्यालयात येणार नागरिक साहेब आहेत का ? कुठे गेले ? असा प्रश्न करताच संबधित कार्यालयात उपलब्ध असलेले कर्मचारी साहेब किंवा मॅडम निवडणुकीचा कामात आहेत. निवडणुकीनंतर भेटतील ,असे उत्तर मिळत आहेत.
नोव्हेंबर महिन्यात नगर परिषदांचा निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला. निवडणुकीसाठी मुदतही अल्प कालावधीची होती. त्यामुळे प्रशासनावर शासनाचा आदेशाचा अंमलबजावणीसाठी धावपळ करण्याची वेळ आहे. नगर परिषदेचा निवडमुका झाल्या. मात्र त्यानंतर निकाल पुढे ढकलण्यात आला. मतदानानंतर तीन डिसेंबरला निकाल लावून मोकळे होणारी शासकिय यंत्रणा पुन्हा २१ डिसेंबरचा मतमोजणीपर्यंत अडकून पडली. त्यामुळे निवडणुकीची जबाबदारी दिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना धड नियमित कार्यालयाची जबाबदारीही पार पाडता येईना असे चित्र होते.
आता नगर परिषदांचा निकाल जाहिर झाला. तोच महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला. त्यामुळे पुन्हा महापालिका निवडणुकीचा जबाबदारी येऊन पडली. पुन्हा काही अधिकारी व कर्मचारी निवडणुकीचा जबाबदारीत अडकले. त्यामुळे त्यांचा नियमित कार्यालयात जाण्यापुर्वीच जबाबदारी आल्याने अनेक अधिकारी व कर्मचारी गेली दोन महिन्यापासून आपल्या नियमित कामे करू शकलेली नाही. आता महापालिका निवडणुकीची धामधुमीत प्रशासकिय कामात गुंतल्याने कार्यालयात जाणे शक्यच नाही. तरीही वेळेत वेळ काढून महत्वाची कामे करावी लागत आहेत. एकंदरीत संबधित अधिकारी व कर्मचारींवर कामाचा भार पडला आहे. त्यातच संबधित विभागाशी संबधित कामासाठी येणारे नागरिकांना अधिकारी किंवा कर्मचारी भेटू शकत नाहीत. त्यामुळे कामानिमित्त येणारा माणूस कार्यलयात येताच साहेब-मॅडम आहेत का ? कुठे गेले ? केव्हा भेटतील अशा प्रकारे प्रश्नांची सरबत्ती करतांना दिसत आहेत. या प्रश्नाला तेथे उपस्थित असलेला कर्मचारीकडून नम्रपणे उत्तर मिळते ते साहेब - मॅडम निवडणुकीचा कामात आहेत, निवडणुकीनंतर भेटतील ...