नाशिक

Bohada Festival Nashik | चांदवडला बोहाडा महोत्सवास प्रारंभ

अंजली राऊत

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – येथील श्रीराम युवक मित्रमंडळाच्या वतीने आयोजित बोहाडा (देवी) महोत्सवास रविवारी (दि.26) उत्साहात प्रांरभ झाला. पहिल्या दिवशी आखाडी महोत्सवाची सुरुवात गणपती आणि शारदा यांच्या पारंपरिक नृत्याने करण्यात आली. आखाडी पाहण्यासाठी पहिल्या दिवशी हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती.

येथील श्रीराम मंडळाच्या वतीने पाचदिवसीय आखाडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध देवी- देवतांचे रूप साकारून पारंपरिक वाद्यांवर नृत्य सादर केले जाणार आहे. हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी चांदवड पंचक्रोशीतील हजारो नागरिक पहिल्या दिवशी उपस्थित होते. रात्री 10 वाजता गणपतीची वेशभूषा विशाल व नीलेश जाधव व शारदेची वेशभूषा दुर्वास जाधव याने साकारली होती. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत गणपती आणि शारदेचे टाळ्या वाजून स्वागत तसेच औक्षण करण्यात आले. त्यांनी पारंपरिक वाद्यांवर आकर्षक नृत्य करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बोहाडा महोत्सव यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे अध्यक्ष मुकेश राऊत, उपाध्यक्ष मुकेश कोतवाल, योगेश बिरार, प्रशांत राऊत, प्रशांत परदेशी, अनिल राऊत, निखिल राऊत, महेश खंदारे आदी प्रयत्नशील आहेत.

दरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ आपल्या विविध कला बाबत प्रसिद्ध आहे. दिंडोरी तालुक्यातील चौसाळे येथील बोहाडा उत्सवात त्यांनी देखील संबळ नृत्य करीत उत्सवाचा आनंद घेतला आहे.

भक्तिमय गीतांना उपस्थितांची दाद

आखाडी महोत्सवानिमित्त सूर निरागस हो हा भक्तिगीतांचा कार्यक्रम गायक योगेश खंदारे व संगीतकार, कलाकार यांनी सादर केला. यावेळी मराठी, हिंदी भावगीते, भक्तिगीते सादर करण्यात आली. भालदार चोपदाराची भूमिका सुरेश बागूल, दिलीप पवार यांनी केली.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT