नाशिक : बाह्यस्त्रोत्राद्वारे भरतीप्रक्रिया रद्द करा या मागणीसाठी आदिवासी आयुक्तालयासमोर गत 23 दिवसांपासून आंदोलनास बसलेल्या बिर्हाडच्या रोजंदारी कर्मचारी वर्ग 3 आणि 4 च्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर व प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत रोजंदारी कर्मचारी वर्गाच्या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. बैठकीत चर्चेदरम्यान मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे दिसून आले असले तरी आंदोलक अद्यापही आंदोलनावर ठाम आहेत.
चर्चेदरम्यान बिर्हाड आंदोलनाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.31) आपले मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडले यात जे प्राथमिक शिक्षक शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसतील अशा शिक्षकांना शासनामार्फत शितलता द्यावी व इतर अनुभवी शिक्षकांना सर्वांना संधी द्यावी अशी मागणी केली. कोणत्याही कर्मचार्यांवर अन्याय केला जाणार नाही जुन्या पद्धतीने रोजंदारी तासिका तत्वावर आदेश देण्यात येतील असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
अतिशय दुर्गम भागात काम करणार्या शिक्षक व शिक्षकेतर वर्ग 4 कर्मचारी सेवा दिलेल्या कार्यकाळाचा नक्कीच शासन विचार करेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चेदरम्यान आदिवासी विकास विभागातील वर्ग 3 व 4 च्या रोजंदारी कर्मचार्यांना न्याय देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.विभागाच्या मंत्र्यांसोबत चर्चा करून तात्काळ निर्णय देण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचंम, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे व बिर्हाड आंदोलनातील ललित चौधरी, रमेश अहिरे,रोहिदास पवार,राहुल जाधव,अमोल तायडे
आदी उपस्थित होते.
---------------
फोटो : बिर्हाड मनसे नावाने सिटी1 मध्ये फोटो सेव्ह केला आहे.